शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण सोडतीत विद्यमान नगरसेवकांना झटका

By admin | Updated: July 2, 2016 00:56 IST

इचलकरंजीत आरक्षणाच्या सोडतीवेळी काही नगरसेवकांना हक्काच्या प्रभागावर पाणी सोडावे लागले.

कोल्हापूर : जिल्ह्यातील ९ नगरपालिकांसाठी शुक्रवारी झालेल्या आरक्षण सोडतीत अनेक विद्यमान नगरसेवकांना हक्काचे प्रभाग राखीव झाल्याने फटका बसला. त्यांनी आतापासूनच जवळच्या ‘सेफ’ प्रभागाची चाचपणी सुरु केली आहे. जिल्ह्यातील नऊही नगरपालिकांत प्रशासनाने जाहीर केलेल्या ठिकाणी व त्या वेळेनुसार आयोजित कार्यक्रमात लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढून आरक्षण निश्चित केले. इचलकरंजीत आरक्षणाच्या सोडतीवेळी काही नगरसेवकांना हक्काच्या प्रभागावर पाणी सोडावे लागले. गडहिंग्लजमध्ये सर्वच विद्यमान नगरसेवकांना पुन्हा आपल्या प्रभागातून लढण्याची संधी मिळाली आहे. जयसिंगपूरमध्ये प्रभाग ६, ८, १० व ११ सर्वसाधारण गटासाठी खुले झाल्याने तेथे रंगत वाढणार आहे. मलकापुरात नगराध्यक्ष, विरोधी पक्ष नेत्यांच्या प्रभागात आरक्षण बदलल्याने त्यांची गोची झाली आहे. कागलमध्ये सात जागा खुल्या झाल्या आहेत. मुरगूडमध्ये आठ प्रभागांतून एकूण सतरा सदस्यांपैकी ९ महिला सदस्यांचे आरक्षण निश्चित झाले. कुरुंदवाडमध्ये नगराध्यक्षा मनीषा डांगे, आघाडीप्रमुख रामचंद्र डांगे, उपनगराध्यक्ष वैभव उगळे, नगरसेवक सुरेश कडाळे यांना पुन्हा त्यांच्या प्रभागातून संधी आहे़ पेठवडगावात विद्यमान काही नगरसेवकांना आरक्षणाचा फटका बसला आहे. (सविस्तर वृत्त हॅलो ५)