शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना सत्तेत आहे का ?

By admin | Updated: June 24, 2015 00:45 IST

राज यांचा टोला : जैतापूर वाद एकत्र बसून मिटविण्याची गरज

रत्नागिरी : जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन शंभर टक्के झाले आहे. प्रकल्पासाठी ८० टक्के निधीचे वितरण झाले आहे. आता या प्रकल्पाला विरोध करणारी शिवसेना सत्तेत आहे काय? असा थेट प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला. तुम्ही सत्तेत आहात, सत्तेत असल्यासारखे वागा. प्रकल्प व्हावा की नको हे शास्त्रज्ञ बघतील. आता विरोध करून काय फायदा? त्यापेक्षा सत्तेत आहात, तर एकत्र बसून वाद मिटवा, असा सल्लाही त्यांनी शिवसेनेला दिला. गेल्या चार दिवसांपासून कोकण दौऱ्यावर असलेले राज ठाकरे मंगळवारी रत्नागिरीत आले होते. त्यावेळी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जैतापूर प्रकल्पाबाबत आपली भूमिका याआधीच आपण स्पष्ट केली आहे. मुंबईसारख्या शहराच्या ठिकाणी भाभा अणुसंशोधन केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून आहे. त्याठिकाणी आवश्यक ते खबरदारीचे उपाय योजले गेले आहेत. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातही असे सुरक्षा उपाय योजले जाणारच आहेत. प्रकल्पाला विरोध हा भूसंपादनाआधी होणे समजण्यासारखे आहे. आता भूसंपादन पूर्ण झाले आहे. प्रकल्पाची बहुतांश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता विरोध करून काय उपयोग आहे, असा प्रश्न त्यांनी केला. कोकणात पर्यटनवृद्धीसाठी दोन-तीन अ‍ॅँकर प्रोजेक्ट होणे आवश्यक आहे. थ्री स्टार, फाईव्ह स्टार हॉटेल्स् होण्याची गरज आहे. मतभेद विसरून उद्धव ठाकरे व आपण भाऊ पुन्हा एकत्र येणार काय, असे विचारल्यास राज यांनी हा नेहमीच विचारला जाणारा प्रश्न आहे, असे सांगत प्रश्नाला बगल दिली. (प्रतिनिधी)संघटनात्मक बदल अटळ!राज्यात विशेषत: कोकणात मनसेने जोर धरलेला नाही, याची गंभीर दखल घेऊन काही निर्णय घेणार काय, असे विचारले असता संघटना मजबूत करण्यासाठी योग्यवेळी निर्णय घ्यावेच लागतात. संघटनेचे बळ वाढण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय, संघटनात्मक काही बदल हे करावेच लागणार आहेत. त्याबाबत चर्चेतून निर्णय घेतला जाईल, असे राज ठाकरे म्हणाले.