शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद शिंपी यांना मिळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:17 IST

-कार्यकर्त्यांचा नेत्यांवर दबाव आजरा : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आजरा जि. प. सदस्य जयवंत शिंपी यांना मिळावे, अशी जोरदार मागणी ...

-कार्यकर्त्यांचा नेत्यांवर दबाव

आजरा : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आजरा जि. प. सदस्य जयवंत शिंपी यांना मिळावे, अशी जोरदार मागणी होत आहे. आजरा नगरपंचायत झाल्यामुळे शिंपी यांना पुन्हा जिल्हा परिषदेची संधी मिळणार नाही. कागलमध्ये मंत्री, खासदारही पदे आहेत. आजरा तालुक्याच्या विकासासाठी जिल्हा परिषद अध्यक्षपद द्यावे, यासाठी कार्यकर्त्यांचा नेत्यांवर दबाव वाढत आहे.

आजरा तालुका म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून बालेकिल्ला आहे. पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. तालुका संघ, जनता बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात असून साखर कारखान्यामध्ये १० संचालक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. तालुक्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व असून गेल्या पंधरा वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आजऱ्याला जिल्हा परिषदेमध्ये संधी मिळालेली नाही. यापूर्वी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते व विद्यमान जि. प. सदस्य उमेश आपटे यांना अध्यक्षपदाची, स्व. बळीरामजी देसाई जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष, स्व. मुकुंद आपटे, अर्थ व शिक्षण सभापती तर, जयवंत शिंपी यांनी बांधकाम समिती सभापतिपद भूषविले आहे. शिंपी यांनी आपल्या बांधकाम समिती सभापतीच्या कालावधीत आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमठविला आहे.

आजऱ्याला नगरपंचायत झाल्यामुळे यापुढे आजरा शहरातील नागरिकांना जि. प. व पं. स.मध्ये जाता येणार नाही. सध्या आजरा जि. प. चे नेतृत्व जयवंत शिंपी करीत आहेत. त्यांना या वेळी अध्यक्षपदही संधी न मिळाल्यास यापुढे ती मिळू शकणार नाही. यासाठी कार्यकर्त्यांनी नेत्यांवर दबाव आणण्यास सुरुवात केली आहे.

आजऱ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांची भेट घेऊन जि. प. अध्यक्षपद जयवंत शिंपी यांना मिळावे याबाबत जोरदार मागणी केली आहे. कागलमध्ये खासदार व मंत्रिपद आहे. बारामतीप्रमाणे विकासही झाला आहे.

जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडण्यामध्ये ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यांनी आजरा तालुक्याला या वेळी संधी दिल्यास राष्ट्रवादीचा बालेकिल्ला पुन्हा एकदा भक्कम होण्यास मदत होणार आहे.