‘शाहूपुरी’ची एम.जी.स्पोर्टस्‌वर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:21 IST2021-03-14T04:21:42+5:302021-03-14T04:21:42+5:30

कोल्हापूर : ‘केडीसीए’तर्फे आयोजित केलेल्या वसंतराव चौगुले चषक गट क्रिकेट स्पर्धेत शनिवारी शाहूपुरी जिमखाना ‘ब’ संघाने एम.जी. स्पोर्टस्‌चा ...

‘Shahupuri’ defeats MG Sports | ‘शाहूपुरी’ची एम.जी.स्पोर्टस्‌वर मात

‘शाहूपुरी’ची एम.जी.स्पोर्टस्‌वर मात

कोल्हापूर : ‘केडीसीए’तर्फे आयोजित केलेल्या वसंतराव चौगुले चषक गट क्रिकेट स्पर्धेत शनिवारी शाहूपुरी जिमखाना ‘ब’ संघाने एम.जी. स्पोर्टस्‌चा पराभव करीत स्पर्धेतील स्थान आणखी बळकट केले.

राजाराम कॉलेजच्या मैदानावर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना एम.जी. स्पोर्टस्‌ने २१.५ षटकांत सर्वबाद ९४ धावा केल्या. यात ऋत्विक वासवाणीने २३, रवी खटवाणीने १९ धावा केल्या. शाहूपुरी जिमखानाकडून अविनाश कांबळेने तीन, तर श्रेअस देसाई व दिवाकर पाटील, विवेक बसर्गे यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. उत्तरादाखल खेळताना शाहूपुरी ‘ब’ने हे आव्हान १६.१ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात सहज पार करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. यात अक्षय पोवारने नाबाद ३४, प्रतीक जमदाडेने १९, शिवम कदमने नाबाद १५ धावा केल्या. एम.जी. स्पोर्टस्‌कडून जयराम आरमाकर, कैलास हसीजा व ऋत्विक वासवाणी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

Web Title: ‘Shahupuri’ defeats MG Sports