शाहीर अरुण शिंदे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:29 IST2021-07-07T04:29:52+5:302021-07-07T04:29:52+5:30

कोल्हापूर : सुर्वेनगर येथील शाहीर अरुण गंगाराम शिंदे (वय ५८) यांचे कोरोनामुळे सोमवारी निधन झाले. ते साळोखेनगर ...

Shahir Arun Shinde passes away | शाहीर अरुण शिंदे यांचे निधन

शाहीर अरुण शिंदे यांचे निधन

कोल्हापूर : सुर्वेनगर येथील शाहीर अरुण गंगाराम शिंदे (वय ५८) यांचे कोरोनामुळे सोमवारी निधन झाले. ते साळोखेनगर येथील श्री शिवशक्ती हायस्कूलमध्ये प्रयोगशाळा सहायक या पदावर कार्यरत होते. तसेच मिमिक्री आर्टिस्ट, निवेदक अशी ओळख निर्माण केली होती. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

शिंदे यांनी पंचवीस वर्षांपासून शाहिरी कलेला वाहून घेतले होते. शाहीर डॉ. आझाद नायकवडी यांच्या शाहिरी पथकात ते शाहिरी कलाकार म्हणून कार्यरत होते. ते एक हरहुन्नरी कलाकार होते. आपल्या मिमिक्रीमधून ते रसिकांना मनमुराद हसवायचे. नाकाद्वारे सनई वादन करून रसिकांची उत्स्फूर्त दाद घ्यायचे. त्यांच्या निधनाने सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.

---

फोटो नं ०६०७२०२१-कोल-अरुण शिंदे (निधन)

---

Web Title: Shahir Arun Shinde passes away