शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सत्तर वर्षाच्या झाडात फुंकला प्राण, वृक्षप्रेमींच्या प्रयत्नामुळे झाले पुनर्रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 18:50 IST

environment kolhapur : इच्छाशक्तीपुढे गगनही ठेंगणे, याचीच प्रचिती कोल्हापुरात आली आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोरील परिसरामध्ये उन्मळून पडलेल्या ७० वर्षे वयाच्या शंभर फुटी पिंपळाच्या झाडामध्ये प्राण फुंकण्यात वृक्षप्रेमींना यश आले आहे. ७० वर्षे वयाच्या या शंभर फुटी पिंपळाच्या झाडाचे शिवाजी विद्यापीठ परिसरात यशस्वी पुनर्रोपण करण्यात आले.

ठळक मुद्देसत्तर वर्षाच्या झाडात फुंकला प्राण, वृक्षप्रेमींच्या प्रयत्नामुळे झाले पुनर्रोपण इच्छाशक्तीपुढे गगनही ठेंगणे : वृक्षप्रेमी वेलफेअर संस्थेच्या जिद्दीला आले यश

संदीप आडनाईककोल्हापूर : इच्छाशक्तीपुढे गगनही ठेंगणे, याचीच प्रचिती कोल्हापुरात आली आहे. कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोरील परिसरामध्ये उन्मळून पडलेल्या ७० वर्षे वयाच्या शंभर फुटी पिंपळाच्या झाडामध्ये प्राण फुंकण्यात वृक्षप्रेमींना यश आले आहे. या झाडाचे शिवाजी विद्यापीठ परिसरात यशस्वी पुनर्रोपण करण्यात आले.आठ दिवसापूर्वी शाहूपुरी पोलीस ठाण्यासमोरील परिसरामध्ये हे पिंपळाचे झाड उन्मळून पडले होते. पर्यावरण संवर्धनावर काम करणाऱ्या कोल्हापुरातील वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन संस्थेने आणि उद्योजक हसमुख शहा यांनी या झाडाचे पुनर्रोपण करण्याचा चंग बांधला. या झाडाच्या फांद्यांचा भार कमी करण्यात आला, त्यानंतर ते जेसीबी, क्रेन आणि ट्रेलरच्या साहाय्याने शिवाजी विद्यापीठ परिसरातील गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक येथे आणून तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर त्याचे पुनर्रोपण करण्यात आले. कोणत्याही शासकीय यंत्रणेशिवाय हे काम पूर्णत्वास गेले.गेले तीन दिवस वृक्षप्रेमी संस्थेचे अमोल बुड्ढे, सदस्य हसमुख शहा, महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य सुहास वायंगणकर, कोल्हापूर अर्थमूव्हर्सचे अध्यक्ष रवींद्र(बापू) पाटील, उपाध्यक्ष संजय नाळे, संजय कसबेकर, आम आदमी पार्टीचे संदीप देसाई, उत्तम पाटील, केडीएमजीचे अभय देशपांडे, संजीव चिपळूणकर प्रा. प्रफुल्ल खेडकर, मन्सूर गोवावाला  अक्षय कांबळे, परितोष उरकुडे, सागर वासुदेवन, सतीश कोरडे, शैलेश टिकार, प्रसाद भोपळे, विकास कोंडेकर, शैलेश पोवार या वृक्षप्रेमींनी अथक परिश्रमानंतर शिवाजी विद्यापीठ परिसरामध्ये हा मोठा वृक्ष पुनर्स्थापित झाला. 

टॅग्स :environmentपर्यावरणkolhapurकोल्हापूर