शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
4
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
5
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
6
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
7
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
8
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
9
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
10
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
11
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
12
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
13
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
14
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
15
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
16
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
17
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
18
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
19
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
20
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
Daily Top 2Weekly Top 5

‘बालगोपाल’ उपांत्य फेरीत

By admin | Updated: April 10, 2015 00:32 IST

नेताजी चषक फुटबॉल : टायब्रेकरवर ‘शिवनेरी’वर मात

कोल्हापूर : बालगोपाल तालीम मंडळाने शिवनेरी स्पोर्टस् संघाचा ४-१ असा टायब्रेकरवर पराभव करीत नेताजी चषक फुटबॉल स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत आज, शुक्रवारी बालगोपाल संघाची पारंपरिक प्रतिस्पर्धी दिलबहार (अ) संघाबरोबर लढत होणार आहे.शाहू स्टेडियम येथे गुरुवारी बालगोपाल व शिवनेरी स्पोर्टस् यांच्यात सामना झाला. प्रारंभापासून ‘बालगोपाल’कडून अक्षय कुरणे, रोहित कुरणे, महादेव तलवार, सचिन गायकवाड यांनी गोल करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेत वेगवान चाली रचण्यास सुरुवात केली. मात्र, ‘शिवनेरी’च्या सजग गोलरक्षकाने त्यांचे गोल करण्याचे इरादे फोल ठरविले. ‘शिवनेरी’कडून दीपराज राऊत, कुमार पचिंद्रे, युवराज पाटोळे, अर्जुन साळोखे, इंद्रजित पाटील, अब्दुल महात, तौसिफ बाणदार यांनीही तितक्याच जोराने प्रतिकार व विरोध करीत गोल करण्यासाठी सातत्याने खोलवर चढाया केल्या. युवराज पाटोळे, तौसिफ बाणदार, दीपराज राऊत यांच्यात योग्य समन्वय नसल्याने गोल करताना प्रत्येक खेळाडू वैयक्तिकपणे खेळतानाचे चित्र दिसले. त्यामुळे संघाला गोल करण्याच्या अनेक संधी असूनही त्यांचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. त्यामुळे पूर्वार्धात सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. उत्तरार्धात सामन्यात अक्षय कुरणे, रोहित कुरणे, महादेव तलवार, सचिन गायकवाड, जयकुमार पाटील यांनी जोरदारपणे आक्रमण केले. मात्र, ‘शिवनेरी’च्या बचावफळीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. ‘शिवनेरी’कडून तौसिफ बाणदार याने मारलेला फटका गोलपोस्टला लागून बाहेर गेला. दोन्ही संघांकडून सामन्यात गोल करण्यापेक्षा बचावावर भर देत सामन्याचा निकाल टायब्रेकरकडे नेण्याचा कल अधिक दिसला. अखेरपर्यंत दोन्ही संघांनी आलेल्या संधी कॅश करण्यापेक्षा बचावावर भर दिला. त्यामुळे सामना संपूर्ण वेळेत गोलशून्य बरोबरीत राहिला. त्यामुळे मुख्य पंचांनी सामन्याचा निकाल टायब्रेकरवर लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ‘बालगोपाल’कडून सुनील मुळीक, प्रतीक पोवार, रोहित कुरणे, सचिन गायकवाड यांनी, तर ‘शिवनेरी’कडून केवळ युवराज पाटोळे याने गोल केला. दीपराज राऊत व उमेश भगत यांचे फटके वाया गेले. त्यामुळे ‘बालगोपाल’ने ४-१ असा सामना जिंकत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.