‘गोकुळ’च्या वतीने अनुदानावर वीर्यमात्रा उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:21 IST2021-04-03T04:21:31+5:302021-04-03T04:21:31+5:30

गोकुळ दूध संघाच्या वतीने पशुसंवर्धन विभागामार्फत जातिवंत जनावरांच्या पैदाशीसाठी कृत्रिम रेतन कार्यक्रम जिल्ह्यामध्ये कार्यरत करण्यात आला होता. या कार्यक्रमातून ...

Semen is available on grant from Gokul | ‘गोकुळ’च्या वतीने अनुदानावर वीर्यमात्रा उपलब्ध

‘गोकुळ’च्या वतीने अनुदानावर वीर्यमात्रा उपलब्ध

गोकुळ दूध संघाच्या वतीने पशुसंवर्धन विभागामार्फत जातिवंत जनावरांच्या पैदाशीसाठी कृत्रिम रेतन कार्यक्रम जिल्ह्यामध्ये कार्यरत करण्यात आला होता. या कार्यक्रमातून ५० टक्के नर आणि ५० टक्के माद्या जन्माला येत होत्या. ५० टक्के नर जन्माला आल्यामुळे दूध उत्पादनासाठी तोटा सहन करावा लागत होता. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान फार मोठ्या प्रमाणात होत होते. ही बाब शासनाच्या लक्षात आल्यानंतर शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने यावर संशोधन करून या वीर्यमात्रांतून फक्त मादी जन्माला येईल असे संशोधन केले होते. या मात्रेसाठी गोकुळच्या वतीने अनुदान देऊन वीर्यमात्रा १८१ रुपयाला देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे जवळपास शेतकऱ्यांचे एका वीर्यमात्रेपोटी बाराशे रुपयांची बचत होऊ लागली. यावेळी दूध संस्था कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष केरबा पाटील, कामधेनू दूध संस्थेचे अध्यक्ष मलगोंडा पाटील, माजी सरपंच हसन राऊत, युवा नेते अभिषेक डोंगळे, सुहास डोंगळे, राजेंद्र चौगले, मुकुंद पाटील, आदी उपस्थित होते.

Web Title: Semen is available on grant from Gokul