Kolhapur: बहिणीच्या लग्नामुळे घरात आनंदाचे वातावरण; वडिलांना मदत म्हणून जनावरांसाठी चारा आणायला गेला, अन्..
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 17:34 IST2025-11-19T17:32:02+5:302025-11-19T17:34:58+5:30
हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Kolhapur: बहिणीच्या लग्नामुळे घरात आनंदाचे वातावरण; वडिलांना मदत म्हणून जनावरांसाठी चारा आणायला गेला, अन्..
हुपरी : जनावरांना चारा आणण्यासाठी गेलेल्या शालेय विद्यार्थ्याचा शेतात पडलेल्या विद्युत वाहिनीला स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाला. अथर्व शिवाजी हांडे (वय १७, राहणार होळकर नगर, हुपरी) असे त्याचे नाव आहे. या घटनेची नोंद हुपरी पोलिस ठाण्यात झाली आहे.
हुपरी रेंदाळ रोडवरील मधल्या रस्त्याजवळ असलेल्या रणदिवे यांच्या शेतात सायंकाळी ही घटना घडली. सुनील सुरेश मुधाळे यांच्या तक्रारीवरून हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान, रविवारी अथर्वच्या बहिणीचा विवाह झाला. घरात आनंदाचे वातावरणात असताना दुसऱ्या दिवशीच ही घटना घडली. अथर्व १२ वीत शिक्षण घेत होता. वडिलांना मदत करण्यासाठी तो चारा आणायला गेला होता, मात्र तो परत आला नाही.