स्कूल बस चालकांना १४ महिन्यांपासून नाही काम; काहीजण शेती करतात, काहीजण पर्यायी काम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:26 AM2021-05-19T04:26:01+5:302021-05-19T04:26:01+5:30

गेल्या वर्षी कोरोनामुळे दि. १५ मार्चपासून जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या शाळा बंद झाल्या. त्यामुळे स्कूलबसची चाके थांबल्याने चालकांचा रोजगारही बंद ...

School bus drivers not working for 14 months; Some farm, some work alternatively! | स्कूल बस चालकांना १४ महिन्यांपासून नाही काम; काहीजण शेती करतात, काहीजण पर्यायी काम!

स्कूल बस चालकांना १४ महिन्यांपासून नाही काम; काहीजण शेती करतात, काहीजण पर्यायी काम!

Next

गेल्या वर्षी कोरोनामुळे दि. १५ मार्चपासून जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या शाळा बंद झाल्या. त्यामुळे स्कूलबसची चाके थांबल्याने चालकांचा रोजगारही बंद झाला. त्यानंतर त्यांना घरी बसावे लागले. काही शाळांनी धान्य कीट, निम्मा पगार देत मदत केली. यावर्षी पुन्हा कोरोनामुळे शाळा बंद झाल्याने स्कूल बस आणि पर्यायाने चालकांचा रोजगार थांबला. त्यात काही शाळांनी या चालकांना थोडीफार मदत केली आहे. पण, त्यावर घरखर्च भागत नसल्याची स्थिती आहे. त्यासह काही चालक हेच बसचे मालक आहेत. त्यांनी कर्ज काढून बस खरेदी केल्या आहेत. या कर्जाचे हप्ते कसे भरायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. उदरनिर्वाहासह कर्जाचे हप्ते भरण्याकरिता पैसे कमविण्यासाठी या चालकांनी पर्यायी रोजगार शोधले आहेत.

पॉईंटर

जिल्ह्यातील एकूण स्कूलबस : ७५०

चालकांची संख्या : सुमारे १२००

किती मुले रोज स्कूलबसने प्रवास करायचे : १८७५०

चौकटी

शेती करतोय

प्रदीप पाटील, खोची

कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी स्कूलबसचे काम थांबले आहे. माझ्या कुटुंबात पाचजण आहेत. लॉकडाऊन लागल्यानंतर शाळेने मदत केली. सध्या शेतीमध्ये काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे.

फोटो (१८०५२०२१-कोल-प्रदीप पाटील (बस)

बदली ड्रायव्हरचे काम करतोय

स्कूल बसची चाके थांबल्याने दर महिन्याला मिळणारा पगारही थांबला आहे. माझे चारजणांचे कुटुंब आहे. शाळेने मदतीचा हात दिला आहे. मात्र, घरखर्च चालविण्यासाठी अन्य वाहनांवर बदली ड्रायव्हर म्हणून सध्या काम करत आहे.

-राम मोरे, शिवाजी पेठ

फोटो (१८०५२०२१-कोल-राम मोरे (बस)

बकरी पालन करतोय

आमचे चारजणांचे कुटुंब आहे. स्कूल बस चालवून मिळणाऱ्या पगारातून घर चालत होते. हे काम थांबल्याने आता कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बकरी पालन सुरू केले आहे. राज्य सरकारने आम्हा स्कूलबस चालकांना मदत करणे आवश्यक आहे.

-म्हाळू गावडे, तामगाव

फोटो (१८०५२०२१-कोल-म्हाळू गावडे (बस)

शेतीमध्ये काम करतोय

लॉकडाऊनमुळे काम बंद असल्याने आर्थिक अडचण झाली आहे. शाळेतून मदत झाली. मात्र, शाळा आणखी किती दिवस बंद राहणार, काम पूर्ववत कधी सुरू होणार हे निश्चित नाही. त्यामुळे सध्या शेतीमध्ये काम करत आहे.

-दगडू पाटील, भुयेवाडी

फोटो (१८०५२०२१-कोल-दगडू पाटील (बस)

पर्यायी काम करतोय

स्कूल बसचे काम थांबल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अन्य वाहनांवर पर्यायी चालक म्हणून काम करत आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक स्थिती कोलमडली असल्याने कर्जाच्या व्याजात सवलत मिळावी.

-प्रकाश गुरव, गोकुळ शिरगाव

फोटो (१८०५२०२१-कोल-प्रकाश गुरव (बस)

मागण्या काय?

१) रिक्षाचालक, बांधकाम कामगारांप्रमाणे स्कूलबस चालकांना सरकारने आर्थिक मदत करावी.

२) बस खरेदीसाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते भरण्यास मुदतवाढ मिळावी.

३) या कर्जाच्या व्याजामध्ये सवलत मिळावी.

४) बसची भरलेली विम्याची रक्कम आम्हाला परत द्यावी अथवा पुढील वर्षासाठी ती वर्ग करावी.

===Photopath===

180521\18kol_13_18052021_5.jpg

===Caption===

डमी (१८०५२०२१-कोल-स्टार ७२८ डमी)

Web Title: School bus drivers not working for 14 months; Some farm, some work alternatively!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.