शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचारप्रकरणी स्कूलबस चालकास सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:27 IST

कोल्हापूर : ज्या बसमधून अल्पवयीन पीडित मुलगी शाळेला जात होती, त्याच बसवरील चालकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विशेष जादा ...

कोल्हापूर : ज्या बसमधून अल्पवयीन पीडित मुलगी शाळेला जात होती, त्याच बसवरील चालकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी विशेष जादा जिल्हा न्यायाधीश ए. एस. महात्मे यांनी आरोपीस चार वर्षे सक्तमजुरी व २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. धनाजी विश्वास कोळी (वय २५, रा. लाटवडे, ता. हातकणंगले) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. विशेष सरकारी वकील अमिता ए. कुलकर्णी यांनी काम पाहिले.

खटल्याची थोडक्यात पार्श्वभूमी अशी की, आरोपी धनाजी कोळी हा पीडित मुलीच्या शाळेच्या बसवर चालक म्हणून कार्यरत होता, त्याने पीडित अल्पवयीन मुलीची ओळख वाढवून ती शाळेला ये-जा करताना तिचा पाठलाग केला. दि.१७ फेब्रुवारी २०१८ रोजी आरोपीने पीडित मुलीचा वडगाव ते नागावपर्यंत दुचाकीवरून पाठलाग केला. तिचा हात पकडून मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. याप्रकरणी वडगाव पोलीस ठाण्यात कोळी याच्यावर बाललैंगिक अत्याचारपासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला होता.

खटल्यात एकूण आठ साक्षीदार तपासले. पीडित मुलीची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच साक्षीदारांचे जबाब, विशेष सरकारी वकील कुलकर्णी यांचा युक्तिवाद, दाखल निवाडे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी धनाजी कोळी याला चार वर्ष सक्तमजुरी व वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. खटल्यात विशेष सरकारी वकिलांना ॲड. भारत शिंदे, ॲड. महेंद्र चव्हाण, तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, सहायक फौजदार शाम बुचडे, पैरवी अधिकारी मिलिंद टेळे व माधवी घोडके यांचे सहकार्य लाभले.

फोटो नं. २००९२०२१-कोल-धनाजी कोळी (आरोपी)

200921\20kol_1_20092021_5.jpg

फोटो नं. २००९२०२१-कोल-धनाजी कोळी (आरोपी)