शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: ‘करवीर’मध्ये ‘नपापा’; ‘सतेज-राहुल-चेतन’ यांची आघाडी; ‘गोकुळ’सह सर्व निवडणुका काँग्रेसच्या झेंड्याखाली

By राजाराम लोंढे | Updated: September 9, 2024 17:42 IST

राजाराम लोंढे कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघात ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके, आ. सतेज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष ...

राजाराम लोंढेकोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघात ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके, आ. सतेज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांची ‘नपापा’ आघाडी उदयास आली आहे. दोन दिवसांपूर्वी तिन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली असून ‘गोकुळ’, जिल्हा बँकेसह सर्व निवडणुकांना काँग्रेसच्या झेंड्याखाली सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल पाटील यांचे विधानसभेचे गणित सोपे करण्यासाठी सतेज पाटील यांनी यशस्वी खेळी खेळली आहे.

जिल्ह्यात १९९० च्या दशकात ‘मनपा’ (महादेवराव महाडिक, अरुण नरके व पी. एन. पाटील) आघाडीने राजकारणात दबदबा निर्माण केला होता. या आघाडीची ‘सांगरूळ’, ‘करवीर’, ‘पन्हाळा-बावडा’ विधानसभा मतदारसंघावर पकड होती. जवळपास पंधरा-वीस वर्षे ‘मनपा’ आघाडीची राजकारणावर पकड होती. आता महादेवराव महाडिक व अरुण नरके सक्रिय राजकारणापासून अलिप्त आहेत. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नव्याने ‘नपापा’ आघाडी उदयास आली आहे.या आघाडीचा परिणाम ‘करवीर’, ‘शाहूवाडी’, ‘कोल्हापूर दक्षिण’ मतदारसंघावर होणार आहे. आ. दिवंगत पी. एन. पाटील यांच्या पश्चात राहुल पाटील करवीरकरांना सामोरे जात आहेत. त्यांच्या समोर चंद्रदीप नरके यांच्या सारखा तगडा पहिलवान आहे. ते २५ वर्षे सक्रिय राजकारणात आहेत, त्यातील दहा वर्षे ‘करवीर’चे प्रतिनिधित्व केले. विरोधकांचे कमकुवत दुवे त्यांना माहीती आहेत. त्यामुळे त्यांनी बेरजेचे राजकारण सुरू केल्याने येथे काटा लढत होणार, हे निश्चित आहे.‘राहुल’ यांचे विधानसभेचे गणित सोडवायचे झाल्यास पन्हाळा महत्त्वाचा असल्याचे सतेज पाटील यांना चांगलेच माहीती आहे. जुना करवीर व गगनबावड्यात सतेज पाटील, जुन्या सांगरूळमध्ये राहुल पाटील, तर पन्हाळ्यातून चेतन नरके यांची ताकद आहे. त्यामुळे हे नवे समीकरण राहुल पाटील यांना बळ देणारे ठरू शकते. पाच वर्षे आपल्यासोबत घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीत डॉ. नरके यांना पुढे करण्याची खेळीही सतेज पाटील यांची असू शकते.

‘कुंभी-कासारी’च्या राजकारणावर परिणामकुंभी कासारी साखर कारखान्यात सत्तांतर करण्यासाठी काँग्रेसने अनेक वेळा निकराचे प्रयत्न केले, पण यश आले नाही. सतेज पाटील, राहुल पाटील व चेतन नरके एकत्र राहिले तर ‘कुंभी’ची निवडणूकही चढ जाऊ शकते.

‘गोकुळ’साठी अरुण नरकेंचा चेहरा उपयुक्त‘गोकुळ’मधील अरुण नरके यांचे योगदान सामान्य दूध उत्पादकांना माहिती आहे. त्यामुळे संघाच्या आगामी निवडणुकीत अरुण नरके यांचा चेहरा सतेज पाटील यांना उपयुक्त ठरू शकतो. ही खेळीही या राजकारणामागील आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभाSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलcongressकाँग्रेस