शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘आण्णा मोगणे’, ‘सागरमाळ’ची सरशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:13 IST

शाहू क्रीडांगण कागल येथे सोमवारी झालेल्या सामन्यांत प्रथम फलंदाजी करताना अश्वमेध संघाने ३१.१ षटकांत सर्वबाद १११ धावा केल्या. यात ...

शाहू क्रीडांगण कागल येथे सोमवारी झालेल्या सामन्यांत प्रथम फलंदाजी करताना अश्वमेध संघाने ३१.१ षटकांत सर्वबाद १११ धावा केल्या. यात हर्ष आमणे २६, सुधीर तोडकर २४, आदित्य चव्हाण २० व प्रथमेश निगडे याने १९ धावा केल्या. मोगणे सहाराकडून गोलंदाजी करताना सुदर्शन कुंभारने पाच, रचित चौगुलेने दोन, स्मित पाटीलने, श्रीराज चव्हाण व प्रथमेश साठे यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. उत्तरादाखल खेळताना मोगणे सहारा संघाने हे आव्हान ११.३ षटकांत ३ बाद ११६ धावा करीत सहजरीत्या पार करीत विजयावर शिक्कामोर्तब केला. यात यशराज कोरोचे नाबाद ४२, श्रीराज चव्हाण नाबाद २६, प्रथमेश साठे १४, रचित चौगुले याने ११ धावा केल्या. ‘अश्वमेध’कडून अभिषेक इंचाळने तीन बळी घेतले. मात्र, त्यांच्या इतर गोलंदाजांना एकही बळी घेता आला नाही.

दुसरा सामना राजाराम काॅलेज मैदानावर सागरमाळ स्पोर्टस्‌ असोसिएशन व शाहू स्पोर्टस्‌ ॲकॅडमी यांच्यात झाला. यात सागरमाळ स्पोर्टस्‌च्या भेदक गोलंदाजीपुढे शाहू स्पोर्टस्‌ला ३०.५ षटकांत सर्वबाद ८० धावा करता आल्या. यात सौरभ जगतापने २०, अभिषेक मंडलिक व राहुल शहा यांनी प्रत्येकी १३ धावा केल्या. सागरमाळ कडून अथर्व पोवारने तब्बल सहा, तर चैतन्य मोडकरने दोन व रुद्र लोंढेने एक बळी घेतला. उत्तरादाखल सागरमाळ स्पोर्टस्‌ने हे आव्हान केवळ ११.४ षटकांत ३ बाद ८३ धावा करीत विजयावर शिक्कामोर्तब केला. यात अलोक कानिटकरने नाबाद ५६ धावा केल्या. शाहू स्पोर्टस्‌कडून धीर मेहता, प्रथम वास्कर, विराज चव्हाण यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. मात्र, त्यांच्यासह इतर गोलंदाज सागरमाळ संघास विजयापासून रोखू शकले नाहीत.