शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
3
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
4
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
5
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
6
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
7
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
8
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
9
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
10
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
11
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
12
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
13
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
14
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
15
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
16
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
17
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
18
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
19
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
20
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

सराफ बाजारपेठ बंद

By admin | Updated: August 14, 2015 23:44 IST

लाखोंची उलाढाल ठप्प : निशिकांत मेथे यांच्या निषेधार्थ सराफ संघाचा ‘बंद’

कोल्हापूर : सभासद निशिकांत मेथे यांनी केलेल्या तक्रारींच्या निषेधार्थ कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या ‘बंद’च्या हाकेला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिल्याने शुक्रवारी सराफ बाजारपेठेत शुकशुकाट होता. या ‘बंद’मुळे लाखोंची उलाढाल ठप्प झाली.सराफ संघाच्या रिफायनरीत टंच काढण्यासाठी दिलेले सोन्याचे मणी व शुद्धतेचा बनावट दाखला दिल्याप्रकरणी निशिकांत मेथे यांनी सराफ संघावर कायदेशीर तक्रार केली. त्यावर संघाच्या कार्यकारिणीने मेथे यांचे आरोप चुकीचे असल्याचा खुलासा करून शुक्रवारी सराफ बाजारपेठ ‘बंद’ची हाक दिली होती. त्यानुसार व्यापारी, व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवली. सकाळी साडेअकरा वाजता संघाच्या कार्यकारिणीने बाजारपेठेतून फेरी काढली. शिवाय काही सुरू असलेली दुकाने बंद करण्यासाठी व्यावसायिकांना आवाहन केले. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता. सोन्याचे दर वाढण्यापूर्वी खरेदीसाठी सराफ बाजारपेठेत ग्राहकांची गर्दी वाढत आहे. यातच बाजारपेठ बंद राहिल्याने ग्राहकांची गैरसोय तर झालीच; शिवाय लाखो रुपयांची उलाढाल ठप्प झाली. (प्रतिनिधी)निशिकांत मेथे यांनी बिनबुडाची तक्रार करून संघाची बदनामी केली आहे. त्याच्या निषेधार्थ संघातर्फे पुकारण्यात आलेल्या ‘बंद’ला सभासद व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कायदेशीर सल्ला घेऊन मेथे यांच्या विरोधात अबु्रनुकसानीचा दावा करण्याची कार्यवाही संघातर्फे केली जाईल. शिवाय त्यांचे सभासदत्व रद्द करण्याचा प्रस्ताव संघाच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येणार आहे.- सुरेश गायकवाड, अध्यक्ष, कोल्हापूर सराफ व्यापारी संघ