शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-रशियाचा करार! पाकिस्तानची झोप उडाली! ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
2
Top Marathi News LIVE Updates: विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरेंनीच लढावी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
3
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
4
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
5
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
6
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
7
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
8
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
9
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
10
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
11
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
12
१५० युद्धनौका, पाणबुड्या बुडाल्या तरी होर्मुझवर इराणचे वर्चस्व...; कशाच्या जोरावर अमेरिकेला आव्हान देतोय...
13
’शिवीगाळ प्रकरणी आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करा,  प्रकाशकांना सुरक्षा द्या’, काँग्रेसची मागणी  
14
पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
15
Monalisa Bhosle : Video - “माझ्या मुलीसोबत असं काही घडेल याची...”; मोनालिसाचे आई-वडील ढसाढसा रडले
16
'कोलकाता पॅटर्न'ने मुंबईतील कंपन्यांना लुटले; फ्रेट व्यवसायाच्या नावाखाली कोट्यवधीचा गैरव्यवहार
17
केवळ ५ सेकंद! चिंतेच्या गर्तेतून बाहेर पडत झपाट्याने कामाला लागण्याचा सर्वात प्रभावी 'माईंड हॅक'!
18
"मराठीचा सन्मान हवाच, पण सक्ती नको"; रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी सरकारविरोधात संजय निरुपम रस्त्यावर उतरणार
19
इराण युद्ध आणि ८५% इथेनॉलचा धोरणात्मक धक्का; आता 'इलेक्ट्रिक' गाडी घेणे ठरणार का शहाणपणाचे?
20
पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान राडा, CPMच्या एजंटवर हल्ला, हाताची बोटं कापल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाईन प्रश्नमंजूषेत संतोष विजेता

By admin | Updated: October 16, 2015 23:23 IST

व्हॉट्स अ‍ॅपवर पहिलीच स्पर्धा : प्रिया पावसकर उपविजेती; देशातील पहिली स्पर्धा

कोल्हापूर : व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून सायन्स ते टेक्नॉलॉजी विषयावरील ‘कलाम ते बच्चन’ या देशातील पहिल्याच आॅनलाईन प्रश्नमंजूषा स्पर्धेत संतोष पाटील यांनी विजेतेपद, तर प्रिया पावसकर यांनी उपविजेतेपद पटकाविले. स्पर्धेत एकूण चार फेऱ्या झाल्या. त्यामध्ये अनुक्रमे ४८, २४, १२ आणि ६ विजेते घोषित करण्यात आले.अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आणि दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनानिमित्त या प्रश्नमंजूषेचे आयोजन केले होते. स्पर्धेसाठी १०० स्पर्धक पात्र ठरले. त्यांना क्वीज मास्टर विजय राऊत यांनी बेळगावहून प्रश्न विचारले. अशा पद्धतीने पहिल्यांदाच स्पर्धा होत स्पर्धकांसह असल्याने व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपच्या सदस्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. स्पर्धेला कोल्हापूरसह सांगली, सातारा, पुणे , मुंबई, सोलापूर, बीड, लातूर, ठाणे, नवी मुंबई आणि बेळगाव भागातून प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत तरुणाईसह व्यापारी, डॉक्टर, वकील, इंजिनिअर्स, सरकारी अधिकारीही सहभागी झाले होते, तर १३ वर्षांच्या एक विद्यार्थ्यानेही भाग घेतला होता. स्पर्धकांमध्ये ३0 टक्के महिला होत्या.कलाम हे सायन्सचे बादशहा, तर बच्चन हे टेक्नॉलॉजी वापरातील शहनशहा होते. प्रश्नमंजूषेचे अभ्यास साहित्य क्वीज मास्टर विजय राऊत यांनी तयार केले. त्याना कुवेत येथील अनिस काझी आणि शिराळा येथील विश्वनाथ पवार यांनी सहाय्य केले. हे साहित्य बच्चन वेडे कोल्हापुरी ग्रुपचे सदस्य संताजी पाटील यांनी तयार केलेल्या कलाम ते बच्चन क्वीज या व्हॉट्स अ‍ॅपअर शेअर केले. या स्पर्धेची अंतिम फेरी एका हॉटेलमध्ये पार पडली. ग्रुपतर्फे आयोजित बच्चन बर्थ डे पार्टी दरम्यान झालेली ही अंतिम फेरीही आॅनलाईनच झाली. या फेरीत पोहोचलेल्या सहापैकी तीन स्पर्धक प्रत्यक्ष उपस्थित होते. तीन सदस्य परगावी असल्यामुळे आॅनलाईन उपस्थित राहिले, तर क्वीज मास्टर विजय राऊत हे बेळगावहुन आॅनलाईन होते. या स्पर्धेतील इतर चार अंतिम विजेत्यांमध्ये सुशांत बाईत (तृतीय), सचिन पाटील (चतुर्थ), पराग जोशी (पाचवा), आशिष शर्मा (सहावा) यांचा समावेश आहे. विजेत्यांना आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या हस्ते तसेच फायटो फार्माचे गुणे यांच्या उपस्थितीत बक्षिसे देण्यात आली. क्रमांक चार, पाच आणि सहाच्या विजेत्यांना अ‍ॅडफाईनचे अमरदीप पाटील, अ‍ॅडव्होकेट इंद्रजित चव्हाण आणि सचिन लिंग्रज यांच्या हस्ते चषक, भेटवस्तू व रोख रक्कम बक्षीस देण्यात आले. ग्रुप अ‍ॅड्मीन सुधर्म वाझे यांनी सूत्रसंचालन केले.