सांगलीच्या तिघी महाराष्ट्र संघात

By Admin | Updated: December 16, 2014 23:48 IST2014-12-16T23:19:32+5:302014-12-16T23:48:31+5:30

मुंबई येथे पार पडलेल्या निवड चाचणीतून या खेळाडूंची निवड झाली आहे़

Sangli's triple Maharashtra team | सांगलीच्या तिघी महाराष्ट्र संघात

सांगलीच्या तिघी महाराष्ट्र संघात

सांगली : तिरूअनंतपुरम् (केरळ) येथे होणाऱ्या ३५ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धे (नॅशनल गेम्स)साठी सांगलीतील तिघींची निवड झाली आहे़ भारतीय आॅलिम्पिक असोसिएशनर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे़
महाराष्ट्राच्या संघात निवड झालेल्या खेळाडू : सुषमा निवृत्ती चंदनशिवे (४६ किलोखालील), पल्लवी अनिल लोहार (४९ ते ५३ किलो), किरण भूपाल पाटील (६८ ते ७३ किलो)़ मुंबई येथे पार पडलेल्या निवड चाचणीतून या खेळाडूंची निवड झाली आहे़ यशस्वी खेळाडूंना संदीप ओंबासे, आनंदराव नलावडे, राष्ट्रीय प्रशिक्षक सुरेश चौधरी, धनंजय पाटील, तानाजी जाधव, सचिन शिंदे, सुभाष खिलार यांचे मार्गदर्शन लाभले़

Web Title: Sangli's triple Maharashtra team