शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
2
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
3
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
4
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
5
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
6
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
7
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
8
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
9
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
10
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
11
होर्मुज सामुद्रधुनीत हाहाकार! NASA कडून अनेक जहाजांना आग लागल्याचे संकेत; हजारो भारतीय खलाशी संकटात
12
नव्या मंत्रिमंडळाची शपथ होत नाही तोच पाटण्यात शिक्षक परीक्षार्थी रस्त्यावर उतरले; पोलिसांचा लाठीमार 
13
जन्मदाता बापच झाला हैवान; संपत्तीच्या वादात नातेवाईकांना अडकवण्यासाठी घेतला मुलाचा बळी
14
"ज्याच्याकडे बहुमत असेल, त्याला सरकार स्थापन करू देणार"; विजय यांचं राज्यपालांनी वाढवलं टेन्शन
15
प. बंगालमध्ये हिंसाचार सुरू असतानाच भाजप 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; केंद्र सरकारने थेट यादीच मागवली
16
Chandranath Rath: बिहारचे शार्प शूटर्स अन् ४० लाखांची सुपारी; चंद्रनाथ रथ हत्या प्रकरणात मोठा खुलासा
17
पश्चिम बंगालनंतर तामिळनाडूत 'राजीनामा' सत्र; १०० हून अधिक सरकारी अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी
18
नवरी जोमात, नवरा कोमात! फोटो काढले, हार घातले पण ऐन मुहूर्तावर 'ती' गायब; लग्नात खळबळ
19
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या लोनच्या व्याजदरात बदल! आता किती झाला रेट? जाणून घ्या
20
Nora Fatehi : 'सरके चुनर' गाण्याप्रकरणी नोरा फतेहीने मागितली माफी; अनाथ मुलींच्या शिक्षणाचा खर्च करणार
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत कृषी प्रदर्शनाचा मंडप कोसळला

By admin | Updated: January 17, 2015 00:19 IST

आंबेडकर क्रीडांगणातील घटना : पंधराजण जखमी; संयोजकांसह दोघांवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सांगली : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर भरविण्यात आलेल्या कृषी व पशु प्रदर्शनाचा मंडप कोसळल्याने प्रदर्शन पाहण्यास आलेले १५ लोक जखमी झाले. आज, शुक्रवारी सकाळी अकराला ही घटना घडली. याप्रकरणी प्रदर्शनाचे संयोजन राजेश शहा (रा. इंद्रप्रस्थनगर) व मंडप व्यावसायिक सुनील माळी (कलानगर, सांगली) यांच्याविरुद्ध दुसऱ्याच्या जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमींमध्ये सुभान इकबाल पटेल (वय २२, रा. पद्माळे), श्रीपाल गोपाळराव आचार्य (५०, रा, माधवनगर, ता. मिरज), अजिंक्य प्रकाश पवार (२२, सावर्डे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांच्यासह अन्यजणांचा समावेश आहे. जखमींवर विविध खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर प्रदर्शनात प्रचंड गोंधळ आणि आरडाओरड सुरु झाली होती. घटनास्थळी शासकीय व खासगी रुग्णवाहिका दाखल झाल्या होत्या. मदतकार्यासाठी पोलिसांचाही फौजफाटा मोठ्या प्रमाणात दाखल झाला होता. जखमी श्रीपाल आचार्य यांची फिर्याद घेऊन पोलिसांनी शहा व माळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ‘रिसोर्सेस’तर्फे दि. १५ ते १८ जानेवारीदरम्यान प्रदर्शन भरविण्यात आले आहे. प्रदर्शनात तीन मोठे मंडप उभे केले आहेत. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे प्रदर्शन सुरु होते. त्यावेळी स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वारापासून प्रवेश करण्यात येणाऱ्या स्टॉलचा मंडप अचानक कोसळला. स्टॉलमध्ये वाहने असल्याने मंडपाचा पत्रा, काठ्या व लोखंडी अँगल त्यावर पडले. स्टॉलमध्ये पन्नासहून अधिक लोक होते. त्यांच्या अंगावरही पत्रे पडले. एका जखमीच्या खांद्यात पत्रा घुसला आहे. घटनास्थळी तातडीने मदत मिळाल्याने अडकलेल्यांना बाहेर काढण्यात यश आले. (प्रतिनिधी)


पावसाची शक्यता असल्याने पत्र्याचा मंडप उभारण्यात आला होता. वाऱ्यामुळे हा मंडप कलून पाच फूट खाली आला. यामुळे २० ते २५ स्टॉलधारकांना याचा फटका बसला. यामध्ये तिघे जखमी झाले. त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले आहेत. आता याठिकाणी कापडी मंडपाची उभारणी केली आहे.
- राजेश शहा
संयोजक, कृषी प्रदर्शन


जिल्हा परिषदेची शहांना नोटीस
राजेश शहा यांनी कृषी प्रदर्शनात जिल्हा परिषद सांगली असा उल्लेख केला असून हा कायदेशीर गुन्हा आहे. याप्रकरणी तुमच्यावर फौजदारी कारवाई का करू नये, अशी नोटीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी राजेश शहा यांना पाठविली आहे. नोटिसीला उत्तर आल्यानंतर शहा यांच्यावर पुढील कारवाई होणार असल्याचेही सतीश लोखंडे यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगण भाड्याने न देण्याबाबत मनपाने ठराव केला असल्याबाबत पत्रकारांनी विचारले असता आयुक्त अजिज कारचे यांनी, घडलेल्या दुर्घटनेची माहिती घेण्यात येईल व त्यानंतरच निर्णय घेणार असून भविष्यात प्रदर्शन भरविण्यासाठी मोकळ्या जागेची सुविधा उपलब्ध करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.