शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सम्राटनगर, प्रतिभानगरात १९ कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:23 IST

कोल्हापूर : कोल्हापुरातील शांत, कमी वर्दळीचा तसेच उच्चभ्रू वस्ती असलेल्या सम्राटनगर, प्रतिभानगरात महानगरपालिकेच्या पथकाने बुधवारी केलेल्या रॅपिड ॲन्टिजन चाचणीत ...

कोल्हापूर : कोल्हापुरातील शांत, कमी वर्दळीचा तसेच उच्चभ्रू वस्ती असलेल्या सम्राटनगर, प्रतिभानगरात महानगरपालिकेच्या पथकाने बुधवारी केलेल्या रॅपिड ॲन्टिजन चाचणीत १९ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्यामुळे त्या परिसराची वाटचाल समूह संसर्गाकडे चालली असल्याचे दिसून येते.

महानगरपालिका प्रशासनाने शहरात विविध ठिकाणी रस्त्यावरून फिरणाऱ्या नागरिकांची अचानक रॅपिड ॲन्टिजन चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या चार पाच दिवसांत झालेल्या चाचण्यांतून एक गंभीर बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली आहे की, कोणतीही लक्षणे नाहीत परंतु अनेक व्यक्ती कोरोनाबाधित असून त्या व्यक्ती राजरोसपणे कुटुंबात, समाजात फिरत आहेत. त्यांच्यामुळे संसर्गाचा धोका वाढलेला आहे.

भाजी मंडईतून २० भाजी विक्रेते कोरोनाबाधित असल्याचे निदर्शनास आले आहे. मिरजकर तिकटी परिसरात दोन दिवस ॲन्टिजन चाचण्या करण्यात आल्या तेव्हा तेथे १३ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे दिसून आले. ॲन्टिजन चाचणी केल्यानंतरच त्यांना आपण कोरोनाबाधित असल्याचे कळले तेव्हा सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

बुधवारी सकाळी जागृतीनगर, सम्राटनगर व प्रतिभानगर परिसरात महापालिकेच्या आरोग्य पथकाने अचानक नागरिकांची रॅपिड ॲन्टिजन चाचण्या सुरू केल्या. तिन्ही ठिकाणी १४८ व्यक्तींची चाचणी करण्यात आली, त्यावेळी तब्बल १९ व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे लक्षात आले. कोरोनाबाधित असलेल्या व्यक्तींना आपणाला कोरोना झाला आहे, याची साधी कल्पनाही नव्हती.

-घरात तीन चार व्यक्ती कोरोनाबाधित-

विनाकारण रस्त्यावर फिरताना एक व्यक्ती मिळून आली म्हणून त्याची कोरोना चाचणी केली असता ती स्वत: बाधित आढळून आली. त्यानंतर घरी कोणकोण असते असे आरोग्य पथकातील कर्मचाऱ्यांनी विचारले तेव्हा चौघे जण आहोत, असे सांगितले. काही वेळाने या चौघांना बोलावून घेऊन पथकाने सर्वांची चाचणी केली. त्यावेळी ते चौघेही बाधित असल्याची गंभीर बाब समोर आली. मात्र, कोणतीही लक्षणे नसल्यामुळे घरात, समाजात त्यांचा वावर मुक्तपणे होता. त्याच्यावरूनच कोरोना संसर्गाचे संकट किती मोठे आहे, हे लक्षात येते.

-पथकातील एक कर्मचारी बाधित-

गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या ॲन्टीजेन चाचण्या करणाऱ्या पथकातील एका महिला कर्मचाऱ्यास कोरोनाची लागण झाली आहे. मनात शंका आली म्हणून त्यांनी आरटीपीसीआर चाचणी करून घेतली. दुर्दैवाने त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला.

कोट-

सम्राटनगर, प्रतिभानगर, जागृतीनगर हा भाग हॉटस्पॉट बनला आहे, आम्ही बुधवारी केलेल्या चाचण्यांतून ते स्पष्ट झाले. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर फिरू नये, घरातून बाहेर पडू नये. अगदीच जरुरीचे असेल तर मास्क लावून बाहेर पडावे.

राजेंद्र पाटील, आरोग्य निरीक्षक

महानगरपालिका