शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

समीर गायकवाडचा अर्ज फेटाळला

By admin | Updated: November 19, 2015 01:30 IST

पानसरे यांच्या हत्येप्रकरण

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला संशयित समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. सांगली) याला तीन अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी न्यायालयासमोर सांगायच्या आहेत. त्यासाठी त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी करणारा त्याच्या वकिलांचा अर्ज प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांनी बुधवारी फेटाळून लावला. आरोपीच्या वकिलांची मागणी मंजूर केल्यास तुरुंग अधिकाऱ्यांच्या हक्कआणि अधिकारामध्ये हस्तक्षेप व ढवळाढवळ होईल, या निकषावर हा अर्ज फेटाळल्याचे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. चंद्रकांत बुधले यांनी सांगितले. पानसरे यांच्या हत्येप्रकरणी संशयित गायकवाड याला दि. १६ सप्टेंबरला कोल्हापूर पोलिसांनी सांगलीत छापा टाकून अटक केली होती. १२ दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर त्याची कळंबा कारागृहात रवानगी केली. दरम्यान, आरोपीचे वकील अ‍ॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी आरोपी गायकवाड हा मला खटल्याच्या दृष्ठीने गोपनीय तसेच त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याशी निगडित अशी माहिती देऊ इच्छितो, तरी त्याच्याकडून तशी माहिती लेखी स्वरूपात घेऊन ती मला मिळावी तसेच ही माहिती देण्यासाठी त्याला न्यायालयात हजर करणेबाबत कारागृह अधीक्षकांना आदेश व्हावा, असा अर्ज सादर केला होता. त्यावर विशेष सरकारी वकील अ‍ॅड. चंद्रकांत बुधले यांनी आरोपीच्या वकिलाने जी मागणी केली आहे, त्यासाठी आदेश करण्याची आवश्यकता नाही, अशी कार्यपद्धती अंमलात आणण्याची गरज नाही. न्यायालय आरोपीला लेखी म्हणणे दे, असे सांगू शकत नाही. आरोपीचे वकील न्यायालयात त्याच्यावतीने अर्ज दाखल करू शकतात. त्यामुळे त्याला न्यायालयात हजर करण्यासाठी आदेश करण्याची गरज नाही. आरोपी ज्या कारागृहात आहे, त्याठिकाणी कागद, पेन उपलब्ध आहे. जर काही अडचणी असतील, तर त्या कारागृह प्रशासन सोडवित असते. कारागृहातील कैदी पत्रे पाठवू शकतात. महाराष्ट्र कारागृह सुविधा १९६२ नियम ३४ प्रमाणे कारागृहात आरोपीला कायदेशीर मदत मिळू शकते. त्यामुळे न्यायालयास जे काही सांगायचे आहे ते आरोपीने पत्रव्यवहाराद्वारे सांगावे, त्यासाठी त्याला न्यायालयात येण्याची काही आवश्यकता नाही. त्यामुळे आरोपीच्या वकिलांनी केलेला अर्ज नामंजूर व्हावा, असा युकितवाद केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्या. डांगे यांनी आरोपीच्या वकिलांचा अर्ज फेटाळून लावला. (प्रतिनिधी) या निकषावर फेटाळला अर्ज कच्चा कैद्यांचा संवाद तोंडी किंवा लेखी असो, तो कारागृह अधीक्षकांकडून नेमलेल्या तुरुंग अधिकाऱ्यांना तपासणी करून त्यामध्ये कमीजास्त करण्याचे अधिकार आहेत. त्याची नोंद पुस्तकात करावी लागत असल्याने कच्चा कैदी अशा प्रकारचा संवाद तोंडी किंवा लेखी बाहेरच्या व्यक्तीस सांगू शकत नाही. कच्चा कैद्यांना जे बाहेरून कपडे येतात किंवा ते जी पत्रे पाठवितात त्यातील मजकूर आक्षेपार्ह व अयोग्य असेल, तर ते खोडू शकतात. काही विशिष्ट परिस्थितीत कैद्यांना दिल्या जाणाऱ्या या सुविधा कारणे नमूद करून काढून घेतल्या जातात. वकिलांची ही मागणी मंजूर केली, तर तुरुंग अधिकाऱ्यांच्या हक्क आणि अधिकारांमध्ये हस्तक्षेप, ढवळाढवळ केल्यासारखे होईल. न्यायालयाने पुढे असेही म्हटले की, आरोपीला कारागृहामध्ये त्याच्या वकिलांना भेटू दिलेले नाही किंवा त्याला लिखाणाचे साहित्य दिलेले नाही, असेही नाही. तसेच वकिलांना लेखी स्वरूपात सांगण्यासाठी आरोपीस कारागृहात मज्जाव केला आहे, असेही नाही. या संपूर्ण गोष्ठींचा विचार करून न्या. डांगे यांनी अर्ज फेटाळला.