शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

संभाजी ब्रिगेडने दाखल केली गुणरत्न सदावर्ते याच्याविरोधात तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 14:06 IST

Maratha Reservation, sambhaji brigade, kolhapur , Pune, Police छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि राजर्षी शाहू महाराज यांचे थेट वारसदार छत्रपती युवराज संभाजी महाराज यांच्या विषयी असभ्य, अपशब्द वापरून मराठा समाजाच्या भावना भडकवणारी विधानं करणाऱ्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, असा तक्रार अर्ज संभाजी ब्रिगेडने हडपसर पोलीस ठाण्यात दिला आहे.

ठळक मुद्देसंभाजी ब्रिगेडने दाखल केली गुणरत्न सदावर्ते याच्याविरोधात तक्रारमराठा नेत्यांना अफजल खानाची उपमा

हडपसर/कोल्हापूर - छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि राजर्षी शाहू महाराज यांचे थेट वारसदार छत्रपती युवराज संभाजी महाराज यांच्या विषयी असभ्य, अपशब्द वापरून मराठा समाजाच्या भावना भडकवणारी विधानं करणाऱ्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, असा तक्रार अर्ज संभाजी ब्रिगेडने हडपसर पोलीस ठाण्यात दिला आहे.छत्रपती संभाजी राजे यांच्यासह मराठा समाजासाठी लढणाऱ्या मराठा नेत्यांना अफजल खानाची उपमा देऊन त्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यामुळे त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.याविषयी सविस्तर माहिती अशी की, मराठा आरक्षणाच्या स्थगिती नंतर ११ ऑक्टोबर २०२० रोजी होणाऱ्या एमपीएससी परीक्षेबाबत मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीतील निर्णयाच्या पार्श्वभूमीवर ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा लाईव्ह कार्यक्रम एका वाहिनीवर सुरु होता, या कार्यक्रमात चर्चेदरम्यान सदावर्ते यांनी छत्रपती संभाजी राजे आणि मराठा नेते यांच्या विषयी असभ्य आणि अपशब्द वापरून बदनामी केली असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे.

सदावर्ते याचा उद्देश महाराष्ट्रामधील कायदा व सुव्यवस्था बिघडुन जातीय दंगली निर्माण करण्याचा आहे. भारतीय संविधानाच्या आडून भावना भडकीवण्याचा खेळ ते खेळत आहे. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक महेश टेळेपाटील, मारुती काळे, सुनील हरपळे आदींनी केली आहे.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणsambhaji brigadeसंभाजी ब्रिगेडkolhapurकोल्हापूरPuneपुणेPoliceपोलिस