शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

साळवण पंचक्रोशीतील लोकमत वृत्तपत्र विक्रेता काळाच्या पडद्याआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 18:36 IST

Kolhapur Death news : गेली २०-२५ वर्ष प्रामाणिकपणे ऊन, पाऊस, थंडीमध्ये अविरतपणे रोज वृत्तपत्र विकत असताना किरवे गावापासून साळवणपर्यंत आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत सर्वांच्या स्मरणात राहणारे मेहबूब बाळू झांजी (भैय्या) (वय ५२ वर्ष) यांच्या अकाली निधनानंतर एक कर्तृत्ववान, सहृदय व्यक्तिमत्व गमावलंय, अशी भावना पंचक्रोशीतुन व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देसाळवण पंचक्रोशीतील लोकमत वृत्तपत्र विक्रेता काळाच्या पडद्याआडनिधनाने त्यांच्या कुटुंबावर शोककळा

साळवण : गेली २०-२५ वर्ष प्रामाणिकपणे ऊन, पाऊस, थंडीमध्ये अविरतपणे रोज वृत्तपत्र विकत असताना किरवे गावापासून साळवणपर्यंत आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत सर्वांच्या स्मरणात राहणारे लोकमत वृत्तपत्र विक्रेता मेहबूब बाळू झांजी (भैय्या) (वय ५२ वर्ष) यांच्या अकाली निधनानंतर एक कर्तृत्ववान, सहृदय व्यक्तिमत्व गमावलंय, अशी भावना पंचक्रोशीतुन व्यक्त होत आहे.सकाळी सूर्योदयाबरोबर त्यांचा दिवस सुरु व्हायचा. सकाळी सहा वाजल्यापासून अकरा-साडे अकरापर्यंत किरव्यापासून साळवण पर्यंतच्या जवळपासच्या दहा-बारा गावात वाड्या वस्त्यांवर रोज वृत्तपत्र वाटणे हा नित्यनियम आणि यानंतर स्वतःचा व्यवसाय सांभाळणे हाही त्यांचा दिनक्रमच.

स्वतःच्या मृदू वाणीने आणि आपल्या गोड, प्रेमळ स्वभावाने सहवासातील व संबंधित सर्व लोकांच्या मनावर त्यांनी भुरळ पाडली होती. त्यामुळेच कि काय त्यांच्या निधनाची बातमी ऐकताच सर्वाना नकळत भावना अनावर झाल्या. आपल्या हयातीत अनेकांना त्यांनी आपलसं करून टाकलं.

रमजान ईद असो वा बकरी ईद,आपल्या सहृदय स्वभावामुळे जोडलेल्या अनेकांना त्यांच्या घरातून शिरकुर्मा आठवणीने पोहोच व्हायचा. वृतपत्र विकत असताना किरवे गावापासून साळवणपर्यंत आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीत जे त्यांनी आपले अतूट संबंध निर्माण केले, त्यामुळे ते कायम सर्वांच्या स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर शोककळा कोसळली आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूkolhapurकोल्हापूर