‘रेमडेसिविर’ काळाबाजारप्रकरणी सेल्स मॅनेजरला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:26 IST2021-04-27T04:26:33+5:302021-04-27T04:26:33+5:30

कोल्हापूर : ‘रेमडेसिविर’ या जीवनरक्षक इंजेक्शन काळ्या बाजारात विकणाऱ्या रॅकेटमधील आणखी एकास अटक केली. पुष्पक नितीन पाटील (वय ३२ ...

Sales manager arrested in 'remedicivir' black market case | ‘रेमडेसिविर’ काळाबाजारप्रकरणी सेल्स मॅनेजरला अटक

‘रेमडेसिविर’ काळाबाजारप्रकरणी सेल्स मॅनेजरला अटक

कोल्हापूर : ‘रेमडेसिविर’ या जीवनरक्षक इंजेक्शन काळ्या बाजारात विकणाऱ्या रॅकेटमधील आणखी एकास अटक केली. पुष्पक नितीन पाटील (वय ३२ रा. राजेंद्रनगर) असे त्याचे नाव आहे. त्यामुळे रॅकेटमधील अटक केलेल्याची संख्या चारवर पोहचली आहे. ज्या कंपनीची रेमडेसिविर इंजेक्शन सापडले, त्याच कंपनीमध्ये तो एरिया सेल्स मॅनेजर म्हणून नोकरीस असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत यांनी केली.

रेमडेसिविर या इंजेक्शनच्या काळाबाजारच्या रॅकेटमधील यापूर्वी योगिराज राजकुमार वाघमारे (रा. सासने मैदान, कोल्हापूर, मूळ गाव- मोहळ, जि. सोलापूर) व पराग विजयकुमार पाटील (वय २६, रा. गणेश कॉलनी, कसबा बावडा), सागर सुतार (वय २४, रा. उजळाईवाडी, कोल्हापूर) यांना अटक केलेली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. या रुग्णासाठी जीवनदायी ठरलेल्या रेमडेसिविर या इंजेक्शनचा तुटवडा भासत आहे. त्याचा गैरफायदा घेऊन रेमडेसिविर इंजेक्शन काळ्याबाजारात विक्री करण्याचा प्रयत्न करणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने उघडकीस आणली. त्यांच्याकडून ११ इंजेक्शन असा ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. आतापर्यंत या रॅकेटमधील चौघांना अटक केली आहे, यामध्ये काहीजणांना अटकेची शक्यता आहे.

Web Title: Sales manager arrested in 'remedicivir' black market case