सा. रे. पाटील बँक लवकरच मल्टिस्टेट : गणपतराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:53 IST2021-02-05T06:53:26+5:302021-02-05T06:53:26+5:30

जयसिंगपूर : सभासदांचा विश्वास सार्थ ठेवत शेतकरी केंद्रबिंदू मानून डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील जकयसिंगपूर उदगाव सहकारी बँक ...

Sa. Ray. Patil Bank soon multistate: Ganapatrao Patil | सा. रे. पाटील बँक लवकरच मल्टिस्टेट : गणपतराव पाटील

सा. रे. पाटील बँक लवकरच मल्टिस्टेट : गणपतराव पाटील

जयसिंगपूर : सभासदांचा विश्वास सार्थ ठेवत शेतकरी केंद्रबिंदू मानून डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील जकयसिंगपूर उदगाव सहकारी बँक काम करीत आहे. भविष्यात बँकेला लवकरच मल्टिस्टेटचा दर्जा प्राप्त होईल, असा विश्वास दत्त कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील यांनी व्यक्त केला. बँकेने क्षारपडमुक्ती उपक्रम हाती घेतला आहे. कोरोनाच्या काळातही बँक व्यवस्थापनाकडून चांगले काम केले असल्याचेही पाटील यांनी यावेळी सांगितले. जयसिंगपूर येथे बँकेची ६१ वी वार्षिक सभा पार पडली. यावेळी सभासदांनी टाळ्यांच्या गजरात विषय मंजूर केले.

प्रारंभी डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक कदम यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले.

बँकेचे अध्यक्ष महादेव राजमाने म्हणाले, बँकेकडून चौदा शाखांद्वारे दोन वर्षात एक हजार कोटीचा व्यवहार करण्याचा मानस आहे.

यावेळी प्रकाश घोडके यांनी बँकेचा अहवाल सादर केला. सभेस शेखर पाटील, विकास कोळी, के. आर. चव्हाण, महेंद्र बागी, विनया घोरपडे, आण्णासाहेब पाटील, एम. व्ही. पाटील, श्रेणिक कुडचे, भूपाल खामकर, सुभाष चौगुले, जनार्दन गोटे, मिलिंद जगदाळे यांच्यासह सभासद उपस्थित होते. लता गायकवाड यांनी सूत्रसंचालन, तर दामोदर सुतार यांनी आभार मानले.

फोटो - २८०१२०२१-जेएवाय-०६

फोटो ओळ - जयसिंगपूर येथे डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील जयसिंगपूर-उदगाव सहकारी बँकेच्या वार्षिक सभेत गणपतराव पाटील यांनी मार्गदर्शन केले.

Web Title: Sa. Ray. Patil Bank soon multistate: Ganapatrao Patil