शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur Municipal Election Results 2026: आमदार क्षीरसागरांच्या मुलाने मारली बाजी, विजय साळोखे पराभूत

By विश्वास पाटील | Updated: January 16, 2026 13:02 IST

सोशल मीडियावर विजयाची हवा तयार केलेल्या विजय साळोखे-सरदार यांचा पराभव

कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीत ८१ प्रभागात लढत झाली असली तरी साऱ्या जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या प्रभाग क्रमांक सातमध्ये शिंदेसेनेचे ऋतुराज राजेश क्षीरसागर विजयी झाले. त्यांनी सोशल मीडियावर विजयाची हवा तयार केलेल्या विजय साळोखे-सरदार यांचा पराभव केला. सोशल मिडीयावर तुम्ही हिरो असो, प्रत्यक्ष प्रभागात म्हणजेच तुमच्या गावांत तुमचे किती वर्चस्व आहे यावरच निवडणूक जिंकता येते याचेच प्रत्यंतर या विजयातून आले.

या लढतीला दोन-तीन महत्त्वाचे पदर होते. आमदार राजेश क्षीरसागर यांचा मुलगाच थेट रिंगणात उतरला होता. त्यामुळे त्याबद्दल मतदारांत संमिश्र भावना होत्या. ओबीसीं मतदारांचा प्रभाव असलेला हा प्रभाग तिथे भाजपचेही कमिटेड मतदान आहे. लिंगायत, मुस्लीम-कुंभार बांधवांचे मतदान चांगल्या टक्क्यांत आहे. अठरापगड मतदार असलेला प्रभाग आहे. जुन्या धाटणीचा, शहराच्या गाभा म्हणता येईल अशा भागातील. ही जागा महाविकास आघाडीत उद्धवसेनेच्या वाट्याला गेली. त्यांनी रिक्षासेनेचे राजेंद्र जाधव यांना उमेदवारी दिल्यावर या जागेवर ऋतुराज यांना बाय दिल्याची चर्चा पहिल्याच दिवशी सुरू झाली.

दोनवेळा नगरसेवक, स्थायी सभापती झालेल्या आणि जो विषय खटकतो त्यावर थेटपणे रिल्स करून सोशल मीडियावर सतत असणाऱ्या विजय साळोखे यांच्या उमेदवारीची चर्चा हळूहळू सुरू झाली. त्यांचे साधेपण, स्वच्छ चारित्र्य आणि रोखठोक स्वभाव लोकांना भावला. त्यातून ते लढतीच्या केंद्रस्थानी आले. त्यांची मोहिम प्रत्यक्ष प्रचारापेक्षा सोशल मीडियावर जास्त होती. त्यावर जगभरातून त्यांना पाठिंबा मिळत होता. त्यामुळे विजयी कोण होते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. क्षीरसागर यांचे या प्रभागातील वर्चस्व, महायुतीची ताकद ऋतुराज यांच्या बाजूला होती. ती ऋतुराज यांच्या विजयासाठी कारणीभूत ठरली. त्यांना विजयाचा आत्मविश्वास होता कारण मतमोजणी सुरु होण्यापूर्वीच क्षीरसागर समर्थकांनी दसरा चौकात ऋतुराज यांच्या विजयाचा फलक लावला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Kshirsagar's son wins Kolhapur election; Salokhe defeated in Ward 7.

Web Summary : Rituraj Kshirsagar of Shinde Sena won Kolhapur Municipal election from Ward 7, defeating Vijay Salokhe. Kshirsagar's local dominance and Mahayuti support proved decisive, overcoming Salokhe's strong social media presence. The election was closely watched due to family ties and diverse voter base.
टॅग्स :Kolhapur Municipal Corporation Electionकोल्हापूर महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६kolhapurकोल्हापूरMunicipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Rajesh Vinayakrao Kshirsagarराजेश विनायकराव क्षीरसागर