शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

रंकाळा येथे डे्रनेजमध्ये गुदमरून कामगाराचा मृत्यू

By admin | Updated: December 21, 2014 00:51 IST

रंकाळा परिसरातील संध्यामठ गल्लीतील वीस फूट ड्रेनेज

कोल्हापूर : रंकाळा परिसरातील संध्यामठ गल्लीतील वीस फूट ड्रेनेजमध्ये काम करीत असताना गुदमरून कामगाराचा आज, शनिवारी दुर्र्दैवी मृत्यू झाला. साबू शेखर भजंत्री (वय २५, रा. खुपिरे, ता. करवीर) असे त्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, रंकाळा परिसरातील संध्यामठ गल्ली, बीएसएनएल कार्यालयासमोर वीस फूट खोल असलेल्या ड्रेनेजचे काम करण्यासाठी सहा कामगार सायंकाळी आले. ड्रेनेजच्या तोंडाचा आकार छोटा आहे. आतमध्ये असलेले पाणी त्यांनी मोटरपंपाच्या साहाय्याने बाहेर काढले. त्यानंतर साबू भजंत्रीसह त्याचा भाऊ मंजू, रमेश रूपसिंह राठोड, त्याचा भाऊ सुनील असे चौघेजण ड्रेनेजमध्ये उतरले. आतील भाग अत्यंत निमुळता असल्याने गॅस पसरलेला होता. काही अंतर वाकून ते आतमध्ये गेले असता चौघांनाही श्वासोच्छ्वास घेण्यास अडथळा होऊ लागला. जास्तच गुदमरल्याने रमेश, सुनील व मंजू यांनी आरडाओरड केली. यावेळी बाहेर उभ्या असलेल्या काशिनाथ लमाणी व सहकाऱ्याने कॉम्प्रेसरने पाईपद्वारे हवा ड्रेनेजमध्ये सोडली. काही प्रमाणात आॅक्सिजन मिळाल्याने तिघेजण बाहेर आले; परंतु साबू हा मागे राहिला असल्याचे लक्षात येताच ते पुन्हा माघारी फिरले असता तो बेशुद्ध होऊन पडलेला दिसला. त्यांनी ओढत त्याला ड्रेनेजमधून बाहेर काढले. या घटनेची माहिती महापालिका अग्निशामक दलास मिळताच जवानांनी घटनास्थळी धाव घेत जखमी साबू भजंत्री याला ‘सीपीआर’मध्ये आणले. याठिकाणी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. घटनास्थळी महापालिकेच्या जलअभियंता विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेतली. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. कामगारांचा आक्रोश साबू भजंत्री याचा सख्खा भाऊ मंजू हा घटनास्थळी होता. भावाचा मृतदेह पाहून त्याला मानसिक धक्का बसला. या घटनेची माहिती खुपिरे गावी समजताच त्याने आई-वडील, नातेवाइकांनी ‘सीपीआर’मध्ये गर्दी केली. यावेळी त्यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.