शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
2
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
3
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
4
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
5
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
6
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
7
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
8
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
9
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
10
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
11
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
13
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
14
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
15
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
16
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
17
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
18
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
19
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
20
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
Daily Top 2Weekly Top 5

शिवदुर्ग संवर्धनासाठी रविवारी गोलमेज परिषद

By admin | Updated: November 27, 2014 23:53 IST

गडकोटांच्या संवर्धनाबद्दल विचारविनिमय करण्यासाठी महाराष्ट्रातील तज्ज्ञ, गडकोटप्रेमी, इतिहासप्रेमी, संशोधक, अभ्यासक

कोल्हापूर : गड-दुर्गांच्या साथीने शिवरायांनी आपल्या स्वराज्याची उभारणी केली; पण दुर्दैवाने या गडकोटांची अवस्था आज अत्यंत दयनीय झाली आहे. या गडकोटांच्या संवर्धनाबद्दल विचारविनिमय करण्यासाठी महाराष्ट्रातील तज्ज्ञ, गडकोटप्रेमी, इतिहासप्रेमी, संशोधक, अभ्यासक यांची रविवारी (दि. ३०) भवानी मंडप येथील मेन राजाराम हायस्कूल येथे सकाळी अकरा वाजता ‘शिवदुर्ग संवर्धन’ गोलमेज परिषद भरविण्यात येणार आहे, अशी माहिती शिवदुर्ग संवर्धन आंदोलनाचे निमंत्रक हर्षल सुर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सुर्वे म्हणाले, हे गडकोट म्हणजे महाराष्ट्राचे वैभव होय. हेच वैभव आता ढासळत चालले आहे. या दुर्गांची देखभाल, दुरुस्ती, संरक्षण आणि पुनर्बांधणी जर केली नाही, तर त्यांचे अस्तित्व राहणार नाही. त्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी ही परिषद बोलावली आहे. इतिहास संशोधक इंद्रजित सावंत म्हणाले, या परिषदेला महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून तज्ज्ञ अभ्यासक, इतिहास संशोधक, इतिहासप्रेमी उपस्थित राहून ते आपले विचार मांडणार आहेत. त्यांच्या विचारांतून गडकोट संवर्धनाचा एक अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार करून तो शासनाला सादर केला जाईल. त्याचसोबत संवर्धनासाठी पुढील दिशाही यावेळी ठरविली जाणार आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंत मुळीक म्हणाले, भवानी मंडप येथील मेन राजाराम हायस्कूल येथे सकाळी ११ वाजता ही परिषद होईल. तरी ज्यांना गडकोट संवर्धनासाठी आपले विचार मांडायचे असतील, त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहावे. या पत्रकार परिषदेस प्रशांत साळुंखे, राहुल भोसले, प्रमोद पाटील, स्वप्निल यादव, अरविंद मेढे-पवार, अमित आडसुळे, गिरीश जाधव, प्रवीण कारंडे, रूपेश जाधव, चैतन्य अष्टेकर, अवधूत पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)