शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
4
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
5
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
6
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
7
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
8
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
9
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
10
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
11
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
12
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
13
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
14
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
15
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
16
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
17
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
18
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
19
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
20
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

साखरेच्या इंधनावर झेपावले रॉकेट

By admin | Updated: September 7, 2014 00:24 IST

प्रक्षेपणाचा थरार : संशोधकांच्या प्रयत्नांना यश, तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांना होणार

कुपवाड : गुजरातमधील इंटरनॅशनल इंडियन युनिव्हर्सिटीच्या संशोधकाकडून साखरेच्या इंधनाचा वापर करून बनविण्यात आलेल्या रॉकेटने आज शनिवारी मिरजेतील क्रीडांगणावर अपेक्षित उद्दिष्ट गाठत आकाशात भरारी घेतली. संशोधकांच्या प्रयत्नांना आलेल्या या यशाला उपस्थितांनी टाळ््यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली. संजय भोकरे ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटच्या मैदानावर मोठ्या उत्साहात प्रक्षेपण करण्यात आले़ स्पेस टेक्नॉलॉजीसह रॉकेट प्रक्षेपणाचा थरार आज या संशोधकाकडून सांगलीकरांना अनुभवायला मिळाला़ समाजहितासाठी या रॉकेट तंत्रज्ञानाचा उपयोग होणार असल्याचेही संशोधकांकडून सांगण्यात आले आहे़दरम्यान, नासाने या रॉकेट प्रक्षेपणाची दखल घेऊन संशोधकांचे अभिनंदन केले असून, भोकरे ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटमध्ये या इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे रिसर्च सेंटर उभारण्यात येणार असल्याची माहिती मिरजेतील अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली़ या रॉकेट प्रक्षेपणाची तीन महिन्यांपासून तयारी करण्यात येत होती़ कॉलेजचे विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधक यासाठी परिश्रम घेत होते़ प्रक्षेपण स्थळाच्या जवळच इंधनाचा डेपो असल्याने दीड किलोमीटरपर्यंतच या रॉकेटचे प्रक्षेपण यशस्वीरित्या करण्यात आले़ यावेळी कॉलेज विद्यार्थ्यासह हजारो नागरिकांनी हा थरार अनुभवण्यासाठी गर्दी केली होती. इंटरनॅशनल इंडियन युनिव्हर्सिटीचे संशोधक किरण नाईक यावेळी म्हणाले की, आम्ही आता समाजहितासाठी रॉकेट बनविणार आहोत़ या रॉकेट तंत्रज्ञानाचा फायदा शेतकऱ्यांसाठी करता येणार आहे़ दुष्काळी भागात कमी खर्चामध्ये पाऊस पाडता येईल़ शासनाचा खर्चही वाचेल़ अतिवृष्टीही थांबविता येईल़ रिसर्च सेंटर उभारून पहिले नागरी विमान तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहोत़ भविष्यात ७ ते १४ किलोमीटर उंचीपर्यंत उडणारे रॉकेट तयार करण्यासाठी शासन व इस्त्रोची मदत घेणार आहोत. यावेळी संजय भोेकरे म्हणाले की, आम्ही संशोधनाला बळ देण्यासाठी जास्तीत-जास्त प्रयत्न करीत आहोत. त्याचाच हा एक भाग आहे. नासाला या रॉकेट प्रक्षेपणाविषयीचा अहवाल गेल्यावर त्यांच्याकडून अभिनंदन केले गेले़ या रॉकेट प्रक्षेपणप्रसंगी इंटरनॅशनल इंडियन युनिव्हर्सिटीचे कुलगुरू किरण नाईक, अब्दुल रहमान वनू, एरोस्पेस विभागप्रमुख राजेश मुनेश्वर, प्रसाद रावराणे, अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय पवार, युवा संशोधक राजेंद्रसिंग रजपूत, डॉ़ चंद्रकांत पाटील, सुमंत कुलकर्णी, कार्यकारी सागर कुलकर्णी, महंमद मणेर, किरण मुळगुंद, डॉ़ एम़ वाय़ खिरे उपस्थित होते़ (वार्ताहर)