वडगावात रस्ता सुरक्षा सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:51 IST2021-02-05T06:51:45+5:302021-02-05T06:51:45+5:30
यावेळी आमदार राजू आवळे म्हणाले, वाहन चालविताना दक्षता महत्त्वाची असते. दुर्दैवी अपघातानंतर कुटुंबे धोक्यात येते; त्यामुळे अपघातपूर्व ...

वडगावात रस्ता सुरक्षा सप्ताह
यावेळी आमदार राजू आवळे म्हणाले, वाहन चालविताना दक्षता महत्त्वाची असते. दुर्दैवी अपघातानंतर कुटुंबे धोक्यात येते; त्यामुळे अपघातपूर्व सुरक्षा महत्त्वाची आहे.
प्रशांत ढेरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी पोलीस निरीक्षक मंगेश गुरव, पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, माजी उपनगराध्यक्षा प्रविता सालपे यांनी मनोगत व्यक्त केले.
बाजार समितीचे सभापती चेतन चव्हाण, एम. के. चव्हाण, फिरोज बागवान, सचिन चव्हाण, कैलास माने, शकील मुजावर, सलीम मोमीन, ओंकार मिरजे, झहीर महात, अनिल सुतार, आदींसह वाहनचालक उपस्थित होते.
फोटो -
पेठवडगाव : येथे मोटारसायकल असोसिएशनच्या वतीने राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या प्रारंभप्रसंगी बोलताना आमदार राजू आवळे. शेजारी चेतन चव्हाण, संतोष घोळवे, प्रविता सालपे, मंगेश गुरव, आदी उपस्थित होते.