शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
2
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
3
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
4
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
5
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
6
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
7
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
8
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
9
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
10
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
11
Latest Marathi News LIVE Updates: आमच्यासाठी निवडणूक नाही तर दादांच्या स्मृतींचा यज्ञ - देवेंद्र फडणवीस
12
सामान्य फोनपेक्षा वेगळा! सॅटेलाइट फोन म्हणजे नक्की काय? भारतात बाळगल्यास होऊ शकते थेट जेल
13
Mumbai Local: मोठा अपघात टळला! CSMT स्थानकात दोन लोकल समोरासमोर! सिग्नल बिघाड अन् मोटरमनचे प्रसंगावधान (Watch Video)
14
IAS Kinjal Singh : संघर्षातून गाठलं यशाचं शिखर; लहानपणी वडिलांची हत्या, आईचा कॅन्सरने मृत्यू, जिद्दीने झाली IAS
15
Video: "नरेंद्र मोदी हे दहशतवादी"; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचे धक्कादायक वक्तव्य, नंतर केली सारवासारव...
16
पाकिस्तानाचा विषारी डाव! फाजिल्कामध्ये काळवंडले नद्यांचे पाणी; पंजाबची जनता आजाराच्या विळख्यात
17
१० हजार+ धावा, १७५ विकेट्स, पण आयपीएलमध्ये ५ वर्षे बेंचवर बसून राहिला 'हा' अष्टपैलू खेळाडू
18
Narasimha Navratri 2026: नृसिंह नवरात्र विशेष: नऊ दिवस नऊ उपासना; संकटमुक्तीसाठी करा ही विशेष साधना!
19
भोंगळ कारभार! रुग्णालयात गर्दी वाढली, सुरक्षा रक्षक झाला 'डॉक्टर'; जखमी तरुणाला घातले टाके
20
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

आयआरबी प्रकरणी उच्च न्यायालयाच्या जाहीर झालेल्या निकालपत्राचे पडसाद

By admin | Updated: November 28, 2014 00:03 IST

प्रशासनाची तक्रार यावरून सभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर : आयआरबी प्रकरणी उच्च न्यायालयाच्या जाहीर झालेल्या निकालपत्राचे पडसाद उद्या, शुक्रवारी होणाऱ्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत उमटण्याची शक्यता आहे. टोलप्रश्नी यापुढे महापालिका न्यायालयीन लढ्यात कशा प्रकारे पाऊल उचलणार याबाबत सभेत चर्चा होणार आहे. शाळांचे खासगीकरण व नगरसेविका सरस्वती पोवार यांच्याविरोधात अवैध बांधकामाबाबत प्रशासनाची तक्रार यावरून सभेत वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.राज्य शासनाच्या निर्णयाची सभागृहास माहिती देणे, नव्याने रुजू झालेल्या अधिकाऱ्यांच्या नेमणुकीसाठी सभागृहाची मान्यता घेणे, आदी विषयांवर चर्चा व शिक्कामोर्तब झाले होते. महापालिकेच्या सात शाळांच्या खासगीकरणाच्या प्रस्तावावर या सभेत निर्णय अपेक्षित आहे. या सभेत शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सात शाळा ‘पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’(पीपीपी) या धर्तीवर विकसित केल्या जाणार आहेत. अण्णा भाऊ साठे मातंग विद्यालय (राजारामपुरी), रंगराव साळोखे विद्यालय (ससूरबाग), महाराणी ताराराणी विद्यालय (मंगळवार पेठ), पद्माराजे विद्यालय मुले व मुलींची शाळा (शुक्रवार पेठ), मुलींची शाळा नं. ५ (शाहूपुरी), नेहरू कन्याशाळा (रविवार पेठ) या शाळांच्या खासगीकरणाचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे. नगरसेवकपदाचा गैरवापर करून अवैध बांधकाम केल्याबद्दलचा सरस्वती पोवार यांच्या अहवालाबाबत निर्णय सभेत होणार आहे. हा प्रस्ताव मंजूर केल्यास अवैध बांधकामप्रकरणी पोवार यांना राजीनामा द्यावा लागणार आहे. प्रस्ताव अमान्य केल्यास अवैध बांधकामास खतपाणी घालण्याचा आरोप होणार आहे. त्यामुळे याप्रकरणी सभागृहात कोणता निर्णय होणार याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)