शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
3
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
4
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
5
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
6
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
7
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
8
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
9
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
10
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
11
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
12
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
13
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
14
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
15
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
16
मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा...
17
ट्रम्प अ‍ॅक्शन मोडमध्ये! संसदेला डावलून ४ देशांना देणार ८१ हजार कोटींची शस्त्रे; 'हे' देश होणार शक्तिशाली
18
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
19
सोलापुरात शेतीच्या वादातून तिहेरी हत्याकांड; दिराने भावजयीसह दोन पुतण्यांची केली निर्घृण हत्या
20
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
Daily Top 2Weekly Top 5

‘नगरोत्थान’च्या रस्त्यांसाठी फेरनिविदा

By admin | Updated: December 9, 2014 23:51 IST

दहा ठिकाणचे रस्ते : १३ कोटींच्या कामासाठी ठेकेदार मिळेना; ‘नगरोत्थान’च्या अडचणीत भर

कोल्हापूर : केंद्र सरकारच्या नगरोत्थान योजनेतून मंजूर झालेल्या रस्त्यांच्या कामांसाठी काढलेल्या निविदेची काल, सोमवारी मुदत संपली. त्यामुळे ठेकेदारांनी असमर्थता दर्शविल्याने शहरातील ए वॉर्डातील विविध दहा रस्त्यांच्या १३ कोटी रुपयांच्या कामांची फेरनिविदा काढावी लागणार आहे. १०८ कोटींच्या या योजनेतील उर्वरित कामे सुरू असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला असला तरी कासव छाप बनलेल्या नगरोत्थान योजनेतील रस्त्यांचे ठेकेदारांना ‘काम घ्या काम’ म्हणण्याची वेळ महापालिकेवर पुन्हा आली आहे. महानगरपालिका प्रशासनाने केंद्र सरकारकडे पाठविलेल्या शहरातील रस्त्यांच्या १०८ कोटींच्या कामांना मंजुरी मिळाली होती. त्यानुसार मुंबईस्थित ‘शांतीनाथ रोडवेज’, ‘रेलकॉन’ व ‘यूव्हीबी’ अशा तीन कंपन्यांनी ही कामे मिळविली होती. मे २०११ मध्ये जेव्हा त्यांना वर्क आॅर्डर दिली गेली, तेव्हा तोंडावर पावसाळा होता. त्यामुळे आॅक्टोबर २०११ पासून पुढे दीड वर्षाची मुदत त्यांना कामे पूर्ण करण्यासाठी देण्यात आली होती. कामाची मुदत संपली तरी केवळ पंधरा टक्के काम पूर्ण झाले. यानंतर पुढील कामे बंद पडली. वेळोवेळी ठेकेदारांना नोटिसा देऊनही त्यांनी कामे पूर्ण करण्यास असमर्थता दाखविल्यामुळे ११ रस्त्यांच्या फेरनिविदा काढल्या. यानंतर संपूर्ण कामांचे विभाजन करून लहान स्वरूपाच्या निविदा तब्बल पाचवेळा काढाव्या लागल्या.मनपाने ठेकेदारांवर वचक बसावा म्हणून त्यांच्या सुरक्षा ठेव रकमा जप्त करण्याचाही निर्णय घेतला. कामांना विलंब लावला म्हणून संबंधित ठेकेदारांना करारातील तरतुदीप्रमाणे प्रतिदिनी दंड केला जाणार आहे. सुरुवातीपासूनच निविदेकडे ठेकेदारांनी पाठ फिरविल्याने ज्या ठेकेदारांना कामे न देण्याचा निर्णय झाला होता व ज्यांच्याविरोधात तक्रारी होत्या, अशांच्याही निविदा महानगरपालिकेने मंजूर केल्या आहेत. डिसेंबरअखेर सर्व रस्त्यांची कामे पूर्ण करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. ए वॉर्डातील १३ कोटींच्या विविध दहा रस्त्यांचे काम करायला ठेकेदार मिळत नसल्याने पुन्हा या रस्त्यांसाठी अल्पकाळाची निविदा काढली जाणार आहे. (प्रतिनिधी) नगरोत्थान योजनेतील उर्वरित २८ किलोमीटरच्या रस्त्यांचे काम वेगाने सुरू आहे. ए वॉर्डातील दहा किलोमीटरच्या रस्त्यांसाठी ठेकेदारांनी प्रतिसाद न दिल्याने आता पुन्हा अल्पकाळाची निविदा प्रसिद्ध केली जाईल. - एम. एम. निर्मळे (कार्यकारी अभियंता, महापालिका)