Red Chilli Price Hike: लाल मिरचीच्या दराचा भडका; खिशाला बसणार झटका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 14:13 IST2026-02-07T14:11:39+5:302026-02-07T14:13:19+5:30

कोल्हापूरकरांनो, यंदा घरगुती मसाला किंवा चटणी बेतानेच करा! कारण पावसाने दिलेल्या फटक्यामुळे लाल मिरचीचे दर आता ग्राहकांच्या खिशाला चटका देऊ लागले आहेत.

Red Chillies Get Spicier! Prices Surge by 30 Percentages Due to Crop Damage | Red Chilli Price Hike: लाल मिरचीच्या दराचा भडका; खिशाला बसणार झटका!

Red Chilli Price Hike: लाल मिरचीच्या दराचा भडका; खिशाला बसणार झटका!

लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : गेल्या वर्षीच्या तुलनेत लाल मिरचीच्या दरात ३० टक्के वाढ झाली आहे. सततचा राहिलेला पाऊस त्यातून मोठ्या प्रमाणात फळगळ झाल्याने आवक मंदावली आहे. त्यामुळे यंदा लाल मिरची ग्राहकांच्या जिभेला चटका देणार, हे निश्चित आहे.  

गेल्या वर्षी मिरचीचे पीक मुबलक झाल्याने आवक वाढली होती. अखंड हंगामात ‘बेडगी’ मिरचीचा भाव ३५० रुपयांच्या पुढे गेला नव्हता. मात्र, यंदा खरीप हंगामात मिरचीचे पीक फुलोरा अवस्थेत असताना पावसाने झोडपून काढल्याने फळगळ मोठ्या प्रमाणात झाली. 

पावसामुळे यंदा मिरचीचे उत्पादन कमी झाल्याने दरात वाढ झाली आहे. त्यामुळे ग्राहकांनी खरेदीसाठी हात आखडता घेतल्याचे चित्र आहे.
राजेंद्र जंगम, मिरची व्यापारी, सांगरूळ 

यंदा आवक कमी झाल्याने दरात मोठी वाढ झाली असून आता जुना मालही बाजारात विक्रीसाठी येत आहे. त्यामुळे ग्राहकांनी खरेदी करताना काळजी घ्यावी.
सुनील अस्वले, मिरची व्यापारी, कोल्हापूर

आंध्र प्रदेश, कर्नाटकातून आवक

कोल्हापूर जिल्ह्यात साधारणत: जानेवारी ते मे असा लाल मिरचीचा हंगाम असतो. या काळात मोठ्या प्रमाणात मिरचीची खरेदी होते. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा व गुजरात येथून मिरचीची आवक होते. 

Web Title : लाल मिर्च के दाम बढ़े, उपभोक्ताओं को झटका!

Web Summary : बारिश से फसल खराब होने के कारण लाल मिर्च के दाम 30% बढ़े। आपूर्ति घटने से उपभोक्ताओं पर महंगाई की मार। आंध्र प्रदेश और कर्नाटक से कोल्हापुर बाजार में आपूर्ति। व्यापारियों ने पुराने स्टॉक की बिक्री के बीच सावधानी बरतने की सलाह दी।

Web Title : Red Chilli Prices Soar, Consumers Feel the Heat!

Web Summary : Red chilli prices surge 30% due to rain-induced crop damage, reducing supply. Consumers face higher costs as Andhra Pradesh and Karnataka supply Kolhapur market. Traders advise caution amidst old stock sales.