शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

स्वागत कमान सैन्यात जाणाऱ्यांसाठी आदर्श ठरेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लोकमत प्रतिनिधी : देश रक्षणासाठी जवानांनी दिलेले बलिदान, केलेला त्याग याची जाणीव आपण सर्वांनी ठेवून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

लोकमत प्रतिनिधी : देश रक्षणासाठी जवानांनी दिलेले बलिदान, केलेला त्याग याची जाणीव आपण सर्वांनी ठेवून अमर जवानांच्या कुटुंबीयांबद्दल आत्मीयता बाळगली पाहिजे, वीरपत्नी सुवर्णा संभाजी पाटील यांनी उभारलेली स्वागत कमान सैन्यात जाणाऱ्या तरुणांच्या पुढे आदर्श ठरेल, असे प्रतिपादन १०९ टी. बटालियनचे सुभेदार आकाराम मोरे यांनी व्यवत्त केले. पेरीड, ता. शाहूवाडी येथे अमर जवान संभाजी लक्ष्मण पाटील यांच्या नावाने उभारलेल्या स्वागत कमानीच्या उद्‌घाटन समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त डीवायएसपी बाजीराव पाटील होते.

बाजीराव पाटील म्हणाले, आपल्या पतीच्या नावाने उभारलेली स्वागत कमान वीरपत्नीसाठी नवा आदर्श घालून दिला आहे. अमर जवानाच्या नावाने गावच्या वेशीवर असणारी स्वागत कमान गावचे सौंदर्य वाढविणार आहे. यावेळी जिल्हा बॅंकेचे संचालक सर्जेराव पाटील, विजय पाटील, सदानंद आग्रे, सोनाली पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी स्वागत कमानीचे उद्‌घाटन नायब तहसीलदार विलास कोळी, सुभेदार आकाराम मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. वीरपत्नी सुवर्णा संभाजी पाटील यांचा सत्कार ज्योत्स्ना बाजीराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पेरीड ग्रामस्थांच्या वतीने वीरपत्नीचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास माजी बांधकाम सभापती सर्जेराव पाटील, माजी सभापती सुभाषराव इनामदार, माजी उपसभापती विष्णू पाटील, महादेव पाटील, पो. नि. विजय पाटील, मेजर श्रावण यादव, सुभेदार पांडुरंग कोकाटे, सरपंच संजय पाटील, नगराध्यक्ष अमोल केसरकर. रंगराव पाटील, प्राचार्य सुनील होळकर, माजी पंचायत समिती सदस्य वंदना पाटील, आबाजी पाटील, आदींसह ग्रामस्थ, सेवनिवृत्त जवान, वीरपत्नी, ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.