शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य उपसंचालक कार्यालयात निघतोय बदल्यांसाठी दर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:28 IST

कोल्हापूर : आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यात देवघेवीचा बाजार होत असून, प्रत्येक पदानुसार दर काढल्याची ...

कोल्हापूर : आरोग्य उपसंचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या चार जिल्ह्यांतील कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्यात देवघेवीचा बाजार होत असून, प्रत्येक पदानुसार दर काढल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील तीन मंत्र्यांच्या शिफारस पत्रालाही केराची टोपली दाखविली जात आहे. या कार्यालयांतर्गत कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे जिल्हे येत असून, यात मंजूर पदसंख्या ३९१४ असून, त्यापैकी २५९२ भरली असून, १३२२ पदे रिक्त आहेत. या देव-घेवीची दखल आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर व आरोग्य संचालकांनीही घेतली आहे. त्याच्या चौकशीचे आदेश दिले जातील, असे राज्यमंत्री यड्रावकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

गतवर्षी कोरोनामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्या बदल्या करण्याचे काम सध्या सुरू असून, यामध्ये प्रत्येक पदासाठी दर ठरले होते. त्यानुसार ज्यांनी ठरलेले पैसे दिले त्याच्याच बदल्यांचे प्रस्ताव करून ऑर्डर काढण्यात आल्या आहेत. यासाठी ही साखळी कार्यालयातील मुख्य प्रशासकीय ‘भवना’पासून सुरू होते. शिशापासून बिडाच्या भाल्यापर्यंत चार ते पाच जणांची यंत्रणा कामाला लागते. ऑर्डर येण्याअगोदरच पैशासाठी या यंत्रणेचा तगादा सुरू होतो. चष्मेवालाही त्यात सहभागी असतो.

चालक बदलासाठी ५० हजार दर निश्चित झाला होता. मात्र, त्या बदल्याच रद्द झाल्याने केलेल्या कामावर पाणी फिरले. शिपाई व क्लार्क पदासाठी ४० ते ५० हजार, टेक्निशियन पदासाठी ६० ते ७० हजार त्याचबरोबर नर्सेस बदल्या व पदोन्नतीसाठी ७० ते ७५ हजार, असे दर ठरल्याची उघडपणे चर्चा सुरू आहे.

याच यंत्रणेकडून विनंती बदल्यासाठी कर्मचाऱ्यांना जिल्ह्यातील मंत्र्यांचे शिफारस पत्र आणायला सांगितले. मात्र, त्या पत्राला केराची टोपली दाखवत ठरल्याप्रमाणे दर काढून वसुली केल्याचे समजते. जे कर्मचारी पैसे देण्यासाठी तयार झाले त्यांचेच प्रस्ताव तयार करून आरोग्य संचालकांना सादर करून त्यावर सह्या घेऊन ऑर्डर काढण्यात आल्या. पुण्यात सही झाल्याबरोबर दुसऱ्या मिनिटापासून कोल्हापुरातील यंत्रणा वसुलीला लागली.

अजून पदोन्नती शिल्लक...

या बदल्यांनंतर कार्यालयांतर्गत शिपाई ते कनिष्ठ लिपिक ते वरिष्ठ लिपिक ते सहायक अधीक्षक ते अधीक्षक अशी पदोन्नती शिल्लक असून, यात शिपाई ते कनिष्ठ लिपिकसाठी शहरात हवे असल्यास १ लाख दर काढल्याची चर्चा कर्मचाऱ्यांत आहे.

कोट...

आरोग्य उपसंचालक कार्यालयांतील भावना चौधरी, शशिकांत सणगर, गौरव भोसले, हुसेन भाले व लोखंडे यांच्या साखळीबाबत माझ्याकडेही लेखी तक्रारी आल्या असून, त्यांच्या चौकशीचे आदेश देणार आहे. - राजेंद्र यड्रावकर, आरोग्य राज्यमंत्री

कोट..

आरोग्य उपसंचालक कार्यालयातील भ्रष्टाचाराच्या साखळीची चौकशी त्याच विभागातील अधिकाऱ्यांमार्फत न होता त्रयस्थ अधिकाऱ्यांकडून व्हावी. इतरही कार्यालयांतील अशी चौकशी त्रयस्थ अधिकाऱ्यांकडून झाली पाहिजे.- अनिल लवेकर, सरचिटणीस, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना