शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

बालिकेवर बलात्कार; संशयिताची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क म्हालसवडे : सावर्डे दुमाला (ता. करवीर) येथे ११ वर्षे वयाच्या बालिकेवर बलात्कार करण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

म्हालसवडे : सावर्डे दुमाला (ता. करवीर) येथे ११ वर्षे वयाच्या बालिकेवर बलात्कार करण्याचा प्रकार झाला. या प्रकरणातील संशयित आरोपी नेताजी बापू खाडे (वय ५२) यांनी हिरवडे दुमाला येथील भोगावती नदीशेजारील स्वत:च्या शेतातील शेडमध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. याची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे.

पोलीस व घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. १०) दुपारी संशयित आरोपी नेताजी खाडे याने खाऊचे आमिष दाखवून ११ वर्षे वयाच्या मुलीला गावच्या मध्यवस्तीत एके ठिकाणी बोलावून बलात्कार केला. दरम्यान मुलीने आरडाओरड करताच त्याने पळ काढला. कुटुंबीयांनी या घटनेची नोंद तत्काळ करवीर पोलिसांत केली. दरम्यान, संशयित आरोपी फरार झाला होता.

हिरवडे दुमाला येथील नदीकाठच्या शेतातील शेडमध्ये मंगळवारी पहाटे आरोपीने गळफास घेतल्याचे नागरिकांच्या लक्षात आले . हिरवडेचे पोलीस पाटील आशिष भाट यांनी या घटनेची नोंद करवीर पोलिसांत केली. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन करून सायंकाळी उशिरा गावात अंत्यसंस्कार करण्यात आले . घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. करवीरचे पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर व करवीर पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत .