मान्सूनच्या आधीच कोल्हापुरातील राजाराम बंधारा पाण्याखाली, वाहतूक ठप्प; पाणीपातळी किती.. वाचा सविस्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 19:27 IST2025-05-23T19:26:07+5:302025-05-23T19:27:23+5:30
जूनच्या एक तारखेला बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटा काढल्या जातात. मात्र..

मान्सूनच्या आधीच कोल्हापुरातील राजाराम बंधारा पाण्याखाली, वाहतूक ठप्प; पाणीपातळी किती.. वाचा सविस्तर
रमेश पाटील
कसबा बावडा: मान्सूनच्या आधीच वळीव पावसाने कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे पंचगंगा नदीच्यापाणी पातळीत वाढ होवून कसबा बावड्यातील राजाराम बंधारा आज, शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास पाण्याखाली गेला. या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सध्या बंधार्याजवळ १७ फूट इतकी पाणी पातळी आहे.
गुरुवारी बंधाऱ्याजवळ साडे पंधरा फूट इतकी पाणी पातळी होती. अवघ्या २४ तासात दीड फुटाने पाणी पातळीत वाढ होऊन ती १७ फुटावर गेली. दरम्यान जूनच्या एक तारखेला बंधाऱ्याच्या लोखंडी प्लेटा काढल्या जातात. मात्र अचानक पडलेल्या पावसामुळे पाटबंधारे विभागाला लोखंडी प्लेटा काढता आल्या नाहीत.
आता पावसाच्या उघडीपी नंतर या प्लेटा काढण्याचे काम पाटबंधारे विभाग हाती घेणार आहे. एकदा काढलेल्या प्लेटा चार महिन्यानंतर म्हणजेच पावसाळा संपल्यानंतरच बसवल्या जातात. दरम्यान बंधाऱ्यावर पाणी आल्याने नेहमी या मार्गावरून कामानिमित्त ये जा करणाऱ्यांना आता लांबचा पल्ल्यावरुन ये-जा करावी लागणार आहे.