कुरुंदवाडमध्ये घरासह दुकानांमध्ये पावसाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:17 IST2021-06-01T04:17:14+5:302021-06-01T04:17:14+5:30

कुरुंदवाड : शहरात सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अवकाळी पावसाने झोडपून काढले. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठी झाडे ...

Rainwater in shops including houses in Kurundwad | कुरुंदवाडमध्ये घरासह दुकानांमध्ये पावसाचे पाणी

कुरुंदवाडमध्ये घरासह दुकानांमध्ये पावसाचे पाणी

कुरुंदवाड : शहरात सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास अवकाळी पावसाने झोडपून काढले. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी मोठी झाडे उन्मळून पडली. तर सखल भागातील अनेक घरात तर मुख्य बाजारपेठेतील सात ते आठ दुकानांत पावसाचे पाणी शिरल्याने दुकानदार व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

शहरात पाचच्या सुमारास अवकाळी पावसाने झोडपून काढले. वादळी वारयामुळे ढेपणपूर भागातील दोन मोठे वृक्ष उन्मळून रस्तावर पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र नगरपालिका आणि महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ उन्मळून पडलेली झाडे मशीनच्या साहाय्याने तोडून रस्ता खुला केला.

मुसळधार पावसामुळे रस्त्यावर एक फूट पाणी वाहू लागल्याने रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले होते. तर रस्त्यावरील पाणी मुख्य बाजारपेठेतील अनेक दुकानात शिरल्याने दुकानदार, व्यापारयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. पाऊस ओसरल्यानंतर नागरिकांनी घरातील पाणी बाहेर काढत होते.

फोटो - ३१०५२०२१-जेएवाय-०६

फोटो ओळ - कुरुंदवाड येथे अवकाळी पावसामुळे ढेपणपूर भागात झाड उन्मळून पडले होते.

Web Title: Rainwater in shops including houses in Kurundwad