शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापुरात पावसाचे पुनरागमन, पण जोर नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:17 IST

कोल्हापूर : रिमझिम का असेना पण पावसाने शुक्रवारी कोल्हापुरात पुनरागमन केले आहे. तब्बल पंधरा दिवसांच्या दडीनंतर आलेल्या या ...

कोल्हापूर : रिमझिम का असेना पण पावसाने शुक्रवारी कोल्हापुरात पुनरागमन केले आहे. तब्बल पंधरा दिवसांच्या दडीनंतर आलेल्या या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून शेतकरी आनंदला आहे. गगनबावड्यात सर्वाधिक १६ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

कोल्हापुरात संपूर्ण मे महिन्यात वळवाने आणि त्यापाठाेपाठ वेळेत आलेल्या मान्सूनने जोरदार सलामी दिल्याने पावसाळ्याच्या पहिल्याच महिन्यात पुराची परिस्थिती निर्माण झाली. जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून मात्र पावसाने उघडीप घेतली. तेव्हापासून शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा लागून राहिली होती. पावसाऐवजी कडकडीत ऊन पडत असल्याने पिकांची होरपळ वाढली होती.

गुरुवारपासून पाऊस सुरु होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता, पण गुरुवारी पावसाने हुलकावणी दिली, दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्याने कांहीसा दिलासा मिळाला. मध्यरात्रीपासून मात्र पावसाचे आगमन झाले. सकाळी सातपर्यंत पाऊस कोसळत राहिला. त्यात फारसा जोर नसलातरी होरपळणारी पिके जगवण्यापुरता पाऊस झाल्याने शेतकरी सुखावला. शुक्रवारी दिवसभर असेच ढगाळ वातावरण राहिले. बारा वाजण्यास सुमारास हलक्याशा सरी कोसळू लागल्या. त्यानंतर दुपारी उघडीप दिली. परत संध्याकाळी पाचनंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली. दरम्यान कमी दाबाचा पट्टा अधिक तीव्र होत असल्याने पुढील चार दिवस जोरदार पावसाचे असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

शेतकऱ्यांची चिंता मिटली

जिल्ह्यात सर्वत्र पावसाने आगमन केल्याने शेतकरी आनंदला आहे. गेल्या महिन्यात पडलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यात ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून पिकेही चांगली तरारली आहेत. आंतरमशागतीची कामेही पूर्ण झाली आहेत. पण ऐन वाढीच्या काळात पावसाने ओढ दिल्याने पीक वाळण्याचे व दुबार पेरणीचे संकट घोंगावत होते. आता पाऊस सुरु झाल्याने ही चिंता पूर्णपणे मिटली आहे.

रोप लागणीला वेग येणार

भात, नाचणीची रोपे तयार आहेत, पण पाऊसच नसल्याने लागणी खोळंबल्या होत्या. आता पाऊस परतल्याने आणि पुढील आठवडाभर दमदार बरसणार असल्याने रोप लागणीच्या कामाला वेग येणार आहे.