शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
4
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
5
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
6
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
7
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
8
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
9
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
10
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
11
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
12
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
13
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
14
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
15
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
16
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
17
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
18
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
19
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
20
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेस ६० टक्के, ‘महाराष्ट्र एक्सप्रेस’ला शंभर टक्के प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:24 IST

कोल्हापूर : राज्यातील अनेक जिल्हे निर्बंधमुक्तीकडे झेपावले असून रेल्वेची चाकेही गतिमान होऊ लागली आहेत. बहुतांशी ठिकाणी रेल्वेची वाहतूक सुरळीत ...

कोल्हापूर : राज्यातील अनेक जिल्हे निर्बंधमुक्तीकडे झेपावले असून रेल्वेची चाकेही गतिमान होऊ लागली आहेत. बहुतांशी ठिकाणी रेल्वेची वाहतूक सुरळीत होत आहे. कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागली आहे. सरासरी ६० टक्के आरक्षणास प्रतिसाद मिळू लागला आहे. तर नागपूर, गोंदियाकडे दुपारी ३.३० वाजता जाणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसचे आरक्षण फुल्ल होऊ लागले आहे.

कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्समधून कोरोनाच्या सलग दोन लाटांनतर केवळ आठ रेल्वे सुरु आहेत. यात कोल्हापूर- मुंबई (कोयना एक्सप्रेस),कोल्हापूर - अहमदाबाद, कोल्हापूर - दिल्ली (निजामुद्दीन), कोल्हापूर - तिरुपती (हरिप्रिया), कोल्हापूर - गोंदिया, कोल्हापूर (महाराष्ट्र एक्सप्रेस),कोल्हापूर - मुंबई (महालक्ष्मी), कोल्हापूर - धनबाद यांचा समावेश आहे. याच एक्सप्रेसना स्पेशल ट्रेन सुरु आहेत. तर अन्य आठ एक्सप्रेसना अजूनही कोरोनाचे निर्बंध असल्यामुळे केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखविलेला नाही. त्यामुळे केवळ आठ रेल्वेगाड्या सुरू आहेत.

एसी ला आरक्षण होऊ लागले

कोरोनाच्या सलग दोन लाटांनंतर कोल्हापूर-मुंबई, कोल्हापूर-नागपूर-गोंदीया, कोल्हापूर-अहमदाबाद, कोल्हापूर-निजामुद्दीन या रेल्वे गाड्यांमधील एसी कोचेसचेही आरक्षण होऊ लागले आहे.

पॅसेंजर कधी सुरु होणार ?

गेल्या दीड वर्षांपासून कोल्हापूर-पुणे, कोल्हापूर-सातारा, कोल्हापूर-सांगली, कोल्हापूर-मिरज, कोल्हापूर-सोलापूर, या महत्त्वाच्या पॅसेंजर अद्यापही बंद आहेत. याबाबतची विचारणा रेल्वेच्या सूत्रांकडे केल्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने अद्यापही सुरु करण्यासंबधी कोणत्याही प्रकारच्या सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे या रेल्वेबाबत सर्व निर्णय केंद्रीय पातळीवर घेतले जात असल्याने काहीच सांगता येत नसल्याचेही या सूत्रांनी स्पष्ट केले.

सर्वाधिक वेटिंग महाराष्ट्र एक्सप्रेसला

कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज टर्मिनन्समधून नागपूर, गोंदियाकडे जाणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसला सर्वाधिक प्रतिसाद मिळत आहे. या रेल्वेचे शंभर टक्के आरक्षण फुल्ल होऊ लागले आहे. त्यामुळे या रेल्वेला केवळ वेटिंग सुरु आहे. विशेषत : गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरहून मुंबईकडे जाणाऱ्या एकमेव कोल्हापूर-मुंबई स्पेशल ट्रेनसाठी सध्या तरी ६५ टक्के आरक्षण हाेत आहे.

कोल्हापूर- दिल्ली, कोल्हापूर-धनबाद मार्गावर प्रवासीसंख्या कमी

कोल्हापूरहून दिल्लीला (निजामुद्दीन) जाण्यासाठी कोल्हापूर-दिल्ली ही विशेष रेल्वे सुरु आहे. या रेल्वेला म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नाही. जेमतेम ५० टक्केपर्यंतचे आरक्षण कोल्हापुरातून मिळत आहे. कोरोनाकाळात परप्रांतीय मजुरांचा आधार असणारी कोल्हापूर-धनबाद एक्सप्रेसला थंडा प्रतिसाद मिळत आहे. कोरोना संसर्गानंतर या रेल्वेला कमी प्रतिसाद मिळू लागला आहे. जसजसी पुढे जाईल त्याप्रमाणे काही प्रमाणात प्रवासी संख्या मिळत आहे.

आपल्या जिल्ह्यातून जाणाऱ्या प्रमुख रेल्वे

कोल्हापूर - मुंबई (कोयना एक्सप्रेस),

कोल्हापूर - अहमदाबाद,

कोल्हापूर - दिल्ली (निजामुद्दीन)

कोल्हापूर - तिरुपती (हरिप्रिया)

कोल्हापूर (महाराष्ट्र एक्सप्रेस)

कोल्हापूर - मुंबई (महालक्ष्मी)

कोल्हापूर - धनबाद

कोल्हापूर-गोंदीया

मास्कसह सोशल डिस्टन्सिंगचे पालन

कोल्हापूरच्या छत्रपती शाहूमहाराज टर्मिनन्समधून मुंबईसह विविध ठिकाणी जाणारे प्रवाशी तोंडाला मास्क व सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसतात. विशेषत: लोहमार्ग पोलीस व केंद्रीय रेल्वे पोलीस याबाबत अजूनही सतर्क आहेत. त्यामुळे मास्क न घालणाऱ्या प्रवाशांची गय केली जात नाही.