आर. के. नगर पोलिस चौकी पुन्हा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:23 IST2021-05-23T04:23:16+5:302021-05-23T04:23:16+5:30

कोल्हापूर येथील आर. के. नगर येथील बंद असलेली पोलिस चौकी पुन्हा सुरू करण्यात आली ...

R. K. City police outpost resumes | आर. के. नगर पोलिस चौकी पुन्हा सुरू

आर. के. नगर पोलिस चौकी पुन्हा सुरू

कोल्हापूर येथील आर. के. नगर येथील बंद असलेली पोलिस चौकी पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख स्मिता सावंत, तालुकाप्रमुख बागेश्री देशपांडे यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांची भेट घेऊन ही बंद असलेली पोलिस चौकी सुरू करण्याची मागणी केली होती. या परिसरात वाहतूक वाढली आहे. गुन्हेगारी कृत्येही वाढली आहेत. त्यामुळे ही पोलिस चौकी पुन्हा सुरू करण्याची गरज या महिला पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती.

याची दखल घेत पुन्हा ही चौकी सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी हजर झालेल्या पोलिसांचे सावंत आणि देशपांडे यांनी फुले देऊन स्वागत केले.

Web Title: R. K. City police outpost resumes