शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

‘आर. डीं.’ना तत्काळ अटक करा

By admin | Updated: November 1, 2015 01:24 IST

हसन मुश्रीफ

कोल्हापूर : आनंदराव चौगले यांना पिस्तुलाचा धाक दाखवून भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक आर. डी. पाटील यांनी आत्महत्येस प्रवृत्त केले. या घटनेचा जाहीर निषेध करून संबंधितांना तत्काळ अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केली. ‘भाजप-ताराराणी’ ही खंडणी वसूल करणारी, गुंडगिरी प्रवृत्तीची असल्याचे आम्ही निवडणुकीच्या सुरुवातीपासून सांगत होतो. त्याचा प्रत्यय शनिवारी जनतेला आला असून, कोल्हापूरच्या सुज्ञ मतदारांनी या आघाडीच्या उमेदवारांची डिपॉझिट जप्त करावी, असे आवाहनही त्यांनी केले. मुश्रीफ म्हणाले, आनंदराव चौगले यांना हकनाक मृत्यूला सामोरे जावे लागले. चौगले यांच्या आत्महत्येस कारणीभूत असलेले आर. डी. पाटील यांना आतापर्यंत अटक होणे गरजेचे होते. आर. डी. पाटील यांच्या भीतीमुळेच आत्महत्या केल्याचे चौगले यांनी चिठ्ठीत स्पष्टपणे म्हटले आहे. त्यामुळे त्यांना तत्काळ अटक होणे गरजेचे होते. पालकमंत्री ‘आर. डीं.’ना पाठीशी घालत आहेत, त्याचा निषेध करतो. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, प्रा. जयंत पाटील, जिल्हा सरचिटणीस अनिल साळोखे, संगीता खाडे उपस्थित होते. राष्ट्रवादीचाच महापौर गेला दीड महिना राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी कोल्हापूर शहरात ठाण मांडले आहे. गल्लोगल्ली जाऊन प्रचार केला. गेले चार-पाच दिवस शहरात राष्ट्रवादीची एक लाट आली आहे. राष्ट्रवादी स्वबळावर महापालिकेवर झेंडा फडकवील व कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादी कॉँग्रेसचाच महापौर होईल, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)