शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
4
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
5
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
6
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
7
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
8
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
9
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
10
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
11
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
12
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
13
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
14
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
15
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
16
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
17
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
18
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
19
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
20
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत’च्या आरोग्याचा जागर विशेषांकाचे प्रकाशन

By admin | Updated: June 11, 2015 01:06 IST

मान्यवरांच्या शुभेच्छा : गडहिंग्लज विभागीय कार्यालयाचा १६वा वर्धापदिन उत्साहात साजरा

गडहिंग्लज : ‘लोकमत’च्या गडहिंग्लज विभागीय कार्यालयाच्या १६व्या वर्धापनदिनानिमित्त प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘आरोग्याचा जागर’ या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सकारात्मक व समाजाभिमुख पत्रकारितेबद्दल कौतुक करून ‘लोकमत’च्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या.नगरपालिकेच्या पू. साने गुरुजी वाचनालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. नगराध्यक्षा लक्ष्मी घुगरे व उपनगराध्यक्षा कावेरी चौगुले, तहसीलदार हनुमंत पाटील, मुख्याधिकारी तानाजी नरळे यांच्याहस्ते विशेषांकाचे प्रकाशन झाले. यावेळी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख व जाहिरात उपव्यवस्थापक श्रीराम जोशी यांची उपस्थिती होती.नगराध्यक्षा घुगरे म्हणाल्या, गडहिंग्लजच्या राजकीय घडामोडीवर अचूक व रोखठोक भाष्य करणाऱ्या ‘लोकमत’ची भूमिका विधायक व समतोल आहे. संस्कारक्षम पिढ्या घडविण्याचे मोलाचे काम ‘लोकमत’ करत आहे.तहसीलदार पाटील म्हणाले, स्पर्धा परीक्षांपासूनच मार्गदर्शक राहिलेल्या ‘लोकमत’चे प्रशासकीय सेवेतही मोलाचे मार्गदर्शन आहे. विधायक व रोखठोक पत्रकारितेतून मूल्याधिष्ठित समाजनिर्मितीत ‘लोकमत’ची भूमिका मोलाची आहे.प्राचार्य जे. बी. बार्देस्कर म्हणाले, प्रत्येक कुटुंबातील सर्वांचा आवडता असणारा ‘लोकमत’ ग्रामीण युवकांचा खरा मार्गदर्शक आहे.डॉ. बी. एस. पाटील म्हणाले, नकारात्मक बातम्यांना दुय्यम स्थान आणि विधायक बातम्यांना पहिल्या पानावर स्थान मिळून सकारात्मक पत्रकारिता सुरू होण्यासाठी ‘लोकमत’ने पुढाकार घ्यावा.सरव्यवस्थापक देशमुख म्हणाले, नेहमी प्रयोगशील राहिलेला ‘लोकमत’ गडहिंग्लज विभागाच्या सर्वांगीण विकासात विधायक भूमिका बजावत आहे. शालेय विद्यार्थी, युवक आणि महिला यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविण्याबरोबरच सकस व संग्राह्य पुरवण्या देण्यात ‘लोकमत’ आघाडीवर आहे. याप्रसंगी महालक्ष्मी यात्रा समिती अध्यक्ष रमेश रिंगणे, गडहिंग्लज अर्बन बँकेचे संचालक व साई एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सतीश पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब घुगरे, शिवसेना तालुकाप्रमुख दिलीप माने, जनसुराज्यचे तालुकाध्यक्ष सोमगोंडा आरबोळे, गडहिंग्लज शहर वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे अध्यक्ष महादेव अडसुळे, प्राचार्य डॉ. मंगलकुमार पाटील, नगरसेवक रामदास कुराडे व नरेंद्र भद्रापूर, बाळासाहेब गुरव, युवराज बरगे, पवन तोरगल्ली, आण्णासाहेब पाटील, ‘लोकमत’चे चंदगड प्रतिनिधी नंदकुमार ढेरे, वार्ताहर विजयकुमार कांबळे (अडकूर), रवींद्र येसादे (उत्तूर), आदी उपस्थित होते.‘लोकमत’चे विभागीय प्रमुख राम मगदूम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. वार्ताहर प्रकाश चोथे यांनी आभार मानले.‘लोकमत’मुळेच निवडणूक बिनविरोधगडहिंग्लज अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी रवींद्र आजरी, तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय बरगे यांची फेरनिवड झालेबद्दल त्यांचा ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक देशमुख व जाहिरात उपव्यवस्थापक जोशी यांच्याहस्ते सत्कार झाला. त्यावेळी ‘लोकमत’मुळेच बँकेची निवडणूक बिनविरोध झाल्याचे आवर्जून नमूद करून सहकार्य व सत्काराबद्दल आजरी यांनी ‘लोकमत’चे आभार मानले.