शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

टिकाव, खोरे, पाटीऐवजी सोलर कंदील द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 14:02 IST

solar lantern zp Kolhapur-कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे गेली कित्येक वर्षे टिकाव, खोरे, पाटी, ताडपदरी, बॅटरी पंप ही साधने अनुदानावर शेतकऱ्यांना पुरवली जातात. पण हे आता शेतकऱ्यांकडे सर्रास उपलब्ध असल्याने त्याऐवजी सोलर कंदील द्यावे, अशी मागणी पुढे आली आहे. कृषी समितीच्या बैठकीत सोलर साधने देण्याचा ठराव करण्यात आला. आता हा मागणी प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला जाणार आहे.

ठळक मुद्देटिकाव, खोरे, पाटीऐवजी सोलर कंदील द्या जिल्हा परिषद कृषी समितीचा ठराव : शासनाकडे परवानगीसाठी प्रस्ताव

कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे गेली कित्येक वर्षे टिकाव, खोरे, पाटी, ताडपदरी, बॅटरी पंप ही साधने अनुदानावर शेतकऱ्यांना पुरवली जातात. पण हे आता शेतकऱ्यांकडे सर्रास उपलब्ध असल्याने त्याऐवजी सोलर कंदील द्यावे, अशी मागणी पुढे आली आहे. कृषी समितीच्या बैठकीत सोलर साधने देण्याचा ठराव करण्यात आला. आता हा मागणी प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला जाणार आहे.जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर कृषी असजारे, साधने पुरवली जातात. कडबाकुट्टी, पीव्हीसी पाईप, मोटार पंप, इंजिन, ताडपदरी, टिकाव, खोरे, पाटी, बॅटरी पंप यासारख्या साधनांसाठी निधीची तरतूद केली जाते. वैयक्तिक लाभाच्या या योजनेसाठी साधारणपणे दरवर्षी पाच-सहा हजार लाभार्थी निवडले जातात. यावर्षीदेखील यासाठी तब्बल १ कोटी ७५ लाखांची तरतूद करण्यात आली आहे.सर्वाधिक मागणी असलेली कडबाकुट्टी, पीव्हीसी पाईप, मोटर पंप याचे वाटप कायम ठेवून त्यातुलनेत आता फारशी गरज नसलेले व बाजारात सहज उपलब्ध असलेली साधने वगळून नवी साधने देता येतात का? याबाबत विचार सुरू होता. बुधवारी स्थायी समिती सभागृहात उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कृषी समितीची बैठक झाली. यावेळी पाच हजार रुपये किमतीचे सोलर कंदील देता येतील का? याबाबत चर्चा होऊन अखेर ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.

टिकाव, खोरे, पाटी, ताडपदरी, बॅटरी पंप यासाठीचे प्रत्येकी १० लाख याप्रमाणे ३० लाखांचा निधी सोलरकडे वळविण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्याचे ठरले. बैठकीला कल्पना चौगुले, गडहिंग्लज सभापती रूपाली कांबळे, करवीर सभापती मीनाक्षी पाटील, कृषीविकास अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी उपस्थित होते.लाभार्थ्यांना आवाहनवैयक्तिक लाभाच्या योजनासाठीचे लाभार्थी निवडीची यादी तयार झाली असू्न, ती बुधवारी अंतिम मान्यतेनंतर तालुक्यात पाठवण्यात आली. लाभार्थ्यांनी साहित्य खरेदी करून तातडीने तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे पावत्या जमा कराव्यात. त्यानंतर लगेचच डीबीटीने त्यांच्या खात्यावर रक्कम जमा होणार आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर