शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

जयसिंगपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशी लस द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:25 IST

जयसिंगपूर : शहराची लोकसंख्या लक्षात घेत योग्य त्या प्रमाणात लसीची उपलब्धता करावी, या मागणीसाठी गुरुवारी प्राथमिक आरोग्य केंद्रातच नगरसेवक ...

जयसिंगपूर : शहराची लोकसंख्या लक्षात घेत योग्य त्या प्रमाणात लसीची उपलब्धता करावी, या मागणीसाठी गुरुवारी प्राथमिक आरोग्य केंद्रातच नगरसेवक बजरंग खामकर, स्वाभिमानीचे सागर मादनाईक यांच्यासह कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले. शहराच्या लोकसंख्येच्या मानाने लसीचा पुरवठा अपुरा असला तरी जास्तीत जास्त लस उपलब्ध करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे, असे वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर यांनी आंदोलकांना सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोनाप्रतिबंधक लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. अनेकांना लसीशिवाय परत जावे लागत आहे. शहराच्या लोकसंख्येच्या मानाने कोविड प्रतिबंधक लसी उपलब्ध करण्याकरिता पाठपुरावा करावा. येत्या ३० एप्रिलअखेर शहरातील ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण पूर्ण करावे, अशी विनंतीही यावेळी करण्यात आली.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. पांडुरंग खटावकर म्हणाले, शासनाकडून दररोज तीनशे ते पाचशे लस उपलब्ध होत आहेत. त्यातील निम्म्याहून अधिक लसी ग्रामीण भागाला पाठवल्यानंतर जयसिंगपूर शहराकरिता केवळ शंभर-सव्वाशे लसी शिल्लक राहतात. जयसिंगपूर शहराची संख्या लक्षात घेता उपलब्ध असणारे लस डोस अपुरे पडतात. त्यामुळे नागरिकांना दुसऱ्या दिवशीकरिता टोकन देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

फोटो - २२०४२०२१-जेएवाय-०३

फोटो ओळ - जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ठिय्या आंदोलनात सहभागी झालेले बजरंग खामकर, सागर मादनाईक यांच्यासह कार्यकर्ते.