शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
4
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
5
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
6
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
7
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
8
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
9
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
10
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
11
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
12
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
13
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
14
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
15
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
16
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
17
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
18
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
19
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
20
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकांना सातव्या वेतन आयोगाचा फरक रोखीने मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:30 IST

कोल्हापूर : प्राध्यापकांना राज्य सरकारकडून देय असलेल्या सातव्या वेतन आयोगातील ५० टक्के फरकाची रक्कम रोखीने दिली जाईल, अशी घोषणा ...

कोल्हापूर : प्राध्यापकांना राज्य सरकारकडून देय असलेल्या सातव्या वेतन आयोगातील ५० टक्के फरकाची रक्कम रोखीने दिली जाईल, अशी घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी कोल्हापुरात केली.

कोल्हापूर दाैऱ्यावर आलेल्या मंत्री सामंत यांची शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ सुटाच्या वतीने सुटाचे प्रमुख कार्यवाह डॉ. डी. एन. पाटील व कोल्हापूर जिल्हा सुटाचे कार्यवाह डॉ. डी. आर. भोसले यांनी भेट घेतली व प्राध्यापकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली. यावेळी फरकाची रक्कम रोखीनेच द्या, अशी मागणी सुटाने केली. यावर मंत्री सामंत यांनी ही फरकाची रक्कम रोख देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे, त्याची लवकरच अंमलबजावणी करू, असे आश्वासन दिले.

प्राध्यापकांच्या रिक्त जागांच्या भरतीबाबत सुटाने केलेल्या मागणीकडे लक्ष वेधताना शासनाने ५० टक्के जागा भरण्याची कार्यवाही सुरू केली असल्याचे सामंत यांनी सांगितले. नेट-सेटचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात काढावा, अशी मागणी झाली, यावरही सामंत यांनी खुलासा करताना शासन याबाबतही सकारात्मक असून लवकरच त्याचेही चांगले परिणाम दिसतील असे सांगितले. प्राध्यापकांच्या स्थाननिश्चितीबाबत तांत्रिक बाबींमुळे निर्माण झालेल्या प्रश्नांमुळे होत असलेल्या नुकसात व्यक्तिशः लक्ष घालून ते प्रश्न निकालात काढावेत, अशी मागणी केली.

फोटो: ०८०६२०२१-कोल-सुटा निवेदन

फोटो ओळ: शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ सुटाच्या वतीने सुटाचे प्रमुख कार्यवाह डॉ. डी. एन. पाटील व कोल्हापूर जिल्हा सुटाचे कार्यवाह डॉ. डी. आर. भोसले यांनी मंगळवारी कोल्हापुरात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन निवेदन दिले.