प्रोफेशनल डेव्हलपमेंट हाच शिक्षकांचा नवा मंत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:52 IST2021-02-05T06:52:38+5:302021-02-05T06:52:38+5:30

कागल : आजची शिक्षण पद्धती १८ व्या शतकातच वावरत आहे. म्हणून शिक्षकांनी २१ व्या शतकातील शिक्षक बनण्याचा प्रयत्न ...

Professional development is the new mantra of teachers | प्रोफेशनल डेव्हलपमेंट हाच शिक्षकांचा नवा मंत्र

प्रोफेशनल डेव्हलपमेंट हाच शिक्षकांचा नवा मंत्र

कागल : आजची शिक्षण पद्धती १८ व्या शतकातच वावरत आहे. म्हणून शिक्षकांनी २१ व्या शतकातील शिक्षक बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आजचा विद्यार्थी जिज्ञासू आणि नवीन तंत्रज्ञानाचे आकलन असणारा आहे. त्याच्या समोर जाताना शिक्षकांनीही अपडेट असले पाहिजे. ‘प्रोफेशनल डेव्हलपमेंट’ हाच शिक्षकांसाठी नवा मंत्र आहे, असे प्रतिपादन ग्लोबल टिचर पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी केले.

पंचायत समिती कागल, शिक्षण विभाग आयोजित गुणगौरव सत्कार समारंभात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते.

ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्याबद्दल रणजितसिंह डिसले यांचा सत्कार मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. यावेळी मंत्री मुश्रीफ आणि रणजितसिंह डिसले यांना मानपत्रही प्रदान आणि विविध गुणवंत शिक्षक, विद्यार्थी यांचा सत्कार करण्यात आला. मंत्री मुश्रीफ म्हणाले की, इंग्रजी शिक्षणाकडे पालकांचा कल वाढून, मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्याचीही पालकांची तयारी आहे. म्हणूनच कॉन्व्हेंटच्या दर्जाचे शिक्षण जिल्हा परिषदांच्या शाळांमधून देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी इंग्रजी माध्यमांच्या तोडीस - तोड जिल्हा परिषदेच्या शाळाही केल्या पाहिजेत.

यावेळी जि. प. सदस्य युवराज पाटील, अमरीशसिंह घाटगे, शिवानी भोसले, शिक्षण सभापती प्रवीण यादव, सभापती पूनम महाडिक, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते. गटशिक्षणाधिकारी जे. बी. कमळकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर विस्तार अधिकारी आर. एस. गावडे यांनी आभार मानले.

. ●रणजितसिंह डिसले पोहोचणार राज्यभर....... मंत्री मुश्रीफ म्हणाले, डिसले यांची राज्यभर फिरून शिक्षकांना मार्गदर्शन करण्याची तयारी आहे. प्रतिनियुक्तीवर त्यांची तशी लवकरच नियुक्ती केली जाईल. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग महाराष्ट्रातील शिक्षकांना व्हावा, त्यांना त्यासाठी सर्व त्या सोयी सुविधाही पुरविल्या जातील. ग्रामविकास विभागाच्या वतीने आठवड्यातच तसा आदेश काढला जाईल.

फोटोओळी .

कागल येथे आयोजित कार्यक्रमात ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांचा सत्कार करताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आला. यावेळी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Professional development is the new mantra of teachers