शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

तुरुंग अधिकाऱ्यावरील हल्ला सूडभावनेतून?

By admin | Updated: September 11, 2014 23:38 IST

कोल्हापुरातील घटना : गायकवाड यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू

कोल्हापूर : येथील आयसोलेशन हॉस्पिटल परिसरात फिरावयास गेलेले कळंबा मध्यवर्ती कारागृहातील मंडल तुरुंग अधिकारी उत्तरेश्वर निवृत्ती गायकवाड (वय ४३, मूळ राहणार उरळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे, सध्या राहणार कळंबा अधिकारी निवासस्थान) यांच्यावर झालेला हल्ला हा सूडभावनेतून की अन्य कारणांमुळे झाला, या दृष्टिकोनातून तपास सुरू असल्याचे राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांनी पत्रकारांना सांगितले.काल, बुधवारी रात्री मंडल तुरुंग अधिकारी उत्तरेश्वर गायकवाड यांच्यावर पाठीमागून आलेल्या तीन अज्ञातांनी स्टंप व काठ्यांनी मारहाण करून हल्ला केला. यात ते जखमी झाले. त्यांच्यावर छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.गायकवाड हे नेहमीप्रमाणे आयसोलेशन हॉस्पिटल परिसरात चारचाकी गाडी लावून चालत फिरावयास गेले. पुन्हा तेथून ते संभाजीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याकडे जात असताना पाठीमागून आलेल्या दोन ते तीन अज्ञातांनी त्यांच्या डोक्यावर व पायावर लाकडी काठी व स्टंपने हल्ला केला. या हल्ल्यानंतर ते अज्ञात पसार झाले. (प्रतिनिधी)कैद्यांची माहिती घेण्याचे काम सुरूगायकवाड यांच्यावर हल्लाप्रकरणी पोलिसांनी कळंबा मध्यवर्ती कारागृहात जाऊन या बरॅकमध्ये असलेल्या कैद्यांची माहिती घेण्याचे काम सुरू केले आहे. हा हल्ला कशामुळे झाला, त्याचा शोध घेणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.उत्तरेश्वर गायकवाड यांच्यावरील हल्ला प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. या हल्ल्यामागे नेमका हेतू काय आहे, हे स्पष्ट झालेले नाही.- अमृत देशमुख, पोलीस निरीक्षकइतर कारागृहांतून माहिती घेणार...गायकवाड यांची यापूर्वी सेवा ठाणे, पुणे व सोलापूर येथील कारागृहांत झाली आहे. तेथील कारागृहांतूनही माहिती घेण्यात येणार आहेत. हा हल्ला स्थानिकांकडून झाला आहे की अन्य कोणी केला आहे, या दृष्टिकोनातून तपास करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.