शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
2
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
3
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
4
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
5
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
7
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
8
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
9
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
10
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
11
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
12
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
13
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
14
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
15
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
16
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
17
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
18
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
19
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
20
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
Daily Top 2Weekly Top 5

राजारामपुरी प्रभागात ‘काँटे की टक्कर’

By admin | Updated: October 20, 2015 00:15 IST

चुलत भाऊ-बहीण आमने-सामने

कोल्हापूर : राजारामपुरी प्रभागावर गेल्या २० वर्षांपासून महानगरपालिकेच्या निवडणुकीत कवाळे कुटुंबीयांचेच राजकीय वर्चस्व दिसून आले आहे. मात्र, यावेळी कवाळे कुटुंबीयांतीलच संदीप कवाळे हे राष्ट्रवादीकडून, तर रूपाली कवाळे या शिवसेनेकडून हे सख्खे चुलत भाऊ-बहीण एकमेकांविरोधात उभे राहिले आहेत. तसेच भाजप-ताराराणी आघाडीचे उमेदवार संग्रामसिंह निंबाळकर यांनीही या प्रभागात कडवे आव्हान उभे केले आहे. त्यामुळे येथे ‘काँटे की टक्कर’ होणार आहे.राजारामपुरी प्रभागाची २००५ च्या निवडणुकीत प्रभाग रचनेतील बदलामध्ये मातंग वसाहतीमधील मतांची विभागणी झाली होती. यंदा मात्र प्रभागात सर्व वसाहतींमधील मतदान एकत्र आले आहे.माजी नगरसेवक शिवाजीराव कवाळे, माजी महापौर कांचनताई कवाळे यांचे चिरंजीव व माजी महापौर कादंबरी कवाळे यांचे पती संदीप कवाळे हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर रिंगणात आहेत. या कुटुंबीयाने निवडणुकांचा पूर्वानुभव व प्रभागात केलेल्या विकासकामांचा मुद्दा या जमेच्या बाजू घेऊन प्रचाराची यंत्रणा जोरदारपणे राबविली आहे.या प्रभागातून नेताजी कवाळे यांच्या कन्या रूपाली कवाळे या शिवसेनेच्या तिकिटावर लढत आहेत. शिवसेनेच्या महिला संघटक म्हणून काम करत असताना त्या महिला बचत गटाद्वारेही प्रभागातील घरोघरी पोहोचल्या आहेत. त्यांच्या कुटुंबीयाकडे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा अनुभव व वडिलांचा जनसंपर्क, तसेच नियोजनबद्ध यंत्रणेमुळे त्यांनी प्रचारात जोर लावला आहे.या प्रभागातून गत निवडणुकीत मंगलादेवी निंबाळकर यांनी जनसुराज्य पक्षाकडून निवडणूक लढवून कवाळे यांना तगडे आव्हान देत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती. यावेळी त्यांचे चिरंजीव संग्रामसिंह निंबाळकर हे भाजप-ताराराणी आघाडीकडून या प्रभागातून निवडणूक लढवीत आहेत. संग्रामसिंह यांचा येथील स्थानिक युवकांशी चांगला संपर्क असल्याने तेही या प्रभागातील घराघरांत पोहोचत आहेत. आमदार अमल महाडिक यांच्या फंडातून त्यांच्या राजारामपुरी पाचव्या व सहाव्या गल्लीत रस्त्यांचे कामसुद्धा सुरू झाले आहे. हीच विकासकामे पुढे करून ते मतदारांसमोर जात आहेत.काँग्रेसकडून या प्रभागातून रूपाली पाटील या रिंगणात आहेत. रूपाली पाटील यांनी महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना राबविल्या आहेत. प्रभागातील महिलांच्या पाठिंब्यावर त्यांनी जोरदार प्रचार यंत्रणा राबविली आहे.तसेच या प्रभागातील एकमेव अपक्ष उमेदवार प्रशांत अवघडे हे भागातील नागरिकांपर्यंत पोहोचविलेल्या विविध शासकीय योजनांच्या आधारावर मतदारांसमोर पोहोचले आहेत. (प्रतिनिधी)