शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
2
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
3
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
4
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
5
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
6
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
7
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
8
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
9
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
10
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
11
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
12
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
13
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
14
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
15
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
16
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
17
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
18
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
19
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
20
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, पण पी. एन. यांचा आग्रह कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:18 IST

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी आमदार पी. एन. पाटील यांनी चिरंजीव राहुल ...

कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी आमदार पी. एन. पाटील यांनी चिरंजीव राहुल यांच्यासाठीचा आग्रह कायम ठेवला आहे. त्यामुळे या निवडीतील उत्सुकता आणखी वाढल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीकडून युवराज पाटील हे प्रमुख दावेदार असून, जयवंतराव शिंपी यांनीही मुंबईपर्यंत जावून प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.

युवराज पाटील हे ‘गोकुळ’साठी इच्छूक होते; मात्र त्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा शब्द देण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता पुन्हा शब्द बदलण्यासाठी मुश्रीफ तयार नाहीत. राज्याचा आपण ग्रामविकास मंत्री असताना आपल्याच एका ज्येष्ठ सहकाऱ्याला हे पद देण्यासाठी मुश्रीफांनी जोडण्या लावल्या आहेत. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात ते बदल करण्यास राजी नाहीत. म्हणूनच त्यांनी दहा दिवसांपूर्वीच पत्रकार परिषदेत अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार, असे जाहीर करून टाकले होते.

सर्वात आधी तीन महिन्यांपूर्वीच पी. एन. यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन राहुल यांना अध्यक्षपदाची संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. राहुल पाटील यांनी गेल्या आठवड्यात जिल्हा बँकेत मुश्रीफ यांची तर अजिंक्यतारावर सतेज पाटील यांची भेट घेतली होती; मात्र अर्ध्या तासातच मुश्रीफ यांनी अध्यक्ष राष्ट्रवादीचा असेल, अशी घोषणा केल्याने युवराज पाटील यांचे नाव चर्चेत आले. सतेज पाटील यांनीही कॉंग्रेसने अध्यक्षपदावरील दावा सोडला नसल्याचे स्पष्ट केल्याने आणखी संभ्रम वाढला.

शुक्रवारच्या बैठकीला पी. एन. शेवटच्या टप्प्यात आले. सदस्यांशी चर्चा झाल्यानंतर सर्व नेतेमंडळी मुश्रीफ यांच्या दालनामध्ये गेली; परंतु तेथे फारशी चर्चा झाली नसल्याचे समजते. त्यामुळे तेथून पी. एन. लगेचच बाहेर पडले.

चौकट

पी.एन, राजू शेट्टी यांची भेट

शासकीय विश्रामगृहावरील बैठकीनंतर शाहूपुरीतील श्रीपतरावदादा बँकेत पी. एन. आणि राजू शेट्टी यांच्यात चर्चा झाली. या दोघांच्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

चौकट

पी.एन., मुश्रीफ, सतेज पाटील यांच्यात बैठकीची शक्यता

‘गोकुळ’च्या निवडणुकीमुळे जरी सतेज आणि पी. एन. एकमेकांविरोधात लढले असले तरी सतेज यांनी पी. एन. यांच्यावर एकाही शब्दाने टीका केली नाही. त्यामुळेच राहुल यांना अध्यक्षपद मिळावे, यासाठी पी. एन. यांनी शुक्रवारी सायंकाळी सतेज यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शनिवारी किंवा अगदीच शक्य झाले नाही तर पन्हाळ्यावर रविवारी मुश्रीफ, सतेज पाटील आणि पी. एन. यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे.

चौकट

भाबडी आशा

राहुल पाटील यांच्या नावासाठी ११ सदस्य आग्रही आहेत. याचा विचार दोन्ही मंत्र्यांनी करावा. हीच संधी असल्याने काहीही करून राहुल यांना पद मिळावे, यासाठी पी. एन. यांच्यावर कार्यकर्त्यांनी दबाव वाढवला आहे. जिल्हा बँक निवडणुकीचा विचार करून मुश्रीफ कदाचित फेरविचार करतील, अशी भाबडी आशा पी. एन. पाटील समर्थक बाळगून आहेत.