शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
2
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
3
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
4
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
5
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
6
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
7
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
8
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
9
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
10
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
11
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
12
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
13
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
14
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
15
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
16
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
17
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
18
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
19
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
20
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

मुरगूड शहराला होणार २४ तास पाणीपुरवठा

By admin | Updated: May 13, 2015 00:56 IST

नगरपरिषद सर्वसाधारण सभा : सुजल योजना लवकरच कार्यान्वित करण्याचा निर्णय

मुरगूड : मुरगूड शहराची व्याप्ती झपाट्याने विस्तारल्याने काही भागामध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होतो हे वास्तव असले तरी संपूर्ण शहराला उच्च दाबाने चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी नवीन योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येणार असून, त्यासाठी सुजल योजनेद्वारे नवीन पाच लाख लिटरची टाकी उभा करण्याचे काम लवकरच सुरू करण्याचा निर्णय मुरगूड नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा वसुधा कुंभार होत्या. मुख्याधिकारी बी. एस. जगताप, शहर अभियंता प्रकाश पोतदार, सूर्याजी भोपळे, अनिस पठाण, अमर कांबळे, अनिल गंदमवाड, संतोष गुरव, दिलीप कांबळे यांनी प्रशासकीय माहिती पुरविली.यावेळी विविध विकासकामांच्या प्राप्त निविदा उघडून किफायतशीर निविदांना सभेने मंजुरी दिली. येणाऱ्या वर्षामध्ये शहरातील घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी १३व्या वित्त आयोगातून निधी मिळणे आवश्यक असून, त्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. पाणीपुरवठा विभागाकडे येणारे वीजबिल १३व्या वित्त आयोगातून प्राप्त निधीतून भरण्याचा निर्णय तसेच येणाऱ्या वर्षामध्ये पालिकेला लागणारे साहित्य व इतर कामाच्या वार्षिक निविदांना ही मंजुरी देण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला.पालिका हद्दीतील रिकाम्या जागेमध्ये गवत कापणी, नारळ उत्पादने, तसेच जनावरांच्या बाजारामधील शेण, कचरा गोळा करण्याच्या वार्षिक लिलावांनाही मंजुरी देण्यात आली. पालिका मालकीच्या एलआयसी कार्यालयाजवळील दुकानगाळ्यांचे भाडे प्रस्ताव त्रिसदस्यीय समिती यांच्याकडून मंजूर करुन येणाऱ्या वर्षात त्याचपद्धतीने ते देण्याचा देकार निविदांनाही सभेत मंजुरी देण्यात आली. सफाई कामगार विष्णू कांबळे यांच्या स्वेच्छा निवृत्तीच्या अर्जावरही चर्चा होवून पुढील कार्यवाहीस पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.प्राथमिक शिक्षण वर्गणी २१ लाख रुपये नगरपरिषदेने जि. प. ला द्यावी, अशा आशयाचा पत्रव्यवहार नगरपरिषदेचे प्रशासन संचालनालय मुंबईकडून प्राप्त झाला असून, यावरही सविस्तर चर्चा होवून निर्णय माहितीअंती घेण्याचे सर्वानुमते ठरले.बौद्ध विहार रंगकाम करणेसाठी आलेल्या अर्जावर चर्चा होऊन रंगकाम करण्यासाठीचा अंदाजित खर्च किती येईल, यावर निर्णय घेण्याचे ठरले.चर्चेत उपनगराध्यक्ष अजितसिंह पाटील, संतोष वंडकर, दगडू शेणवी, शिवाजी इंदलकर, किरण मवाणकर, सुहास खराडे, परेश चौगले, रेखा सावर्डेकर, नम्रता भांदिगरे, माया चौगले यांनी सहभाग घेतला. (वार्ताहर)सत्तेमध्ये विरोधी नगरसेवकांनी शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होतो याबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना माजी नगराध्यक्ष प्रवीणसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. शहराचा विस्तार झपाट्याने झाल्याने आणि पाणीपुरवठा करणारी योजना जुनीच असल्याने काही भागात नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा होत नाही. शिवाय काही भागात तो कमी दाबानेच होतो. त्यामुळे सुजल योजनेंतर्गत २४ तास पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करत असून, लवकरच ही योजना कार्यान्वित होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.