शहरात ४२ हजार ६४७ बालकांना पोलिओ डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:55 IST2021-02-05T06:55:05+5:302021-02-05T06:55:05+5:30
कोल्हापूर : शहरात महापालिका प्रशासनाकडून रविवारी पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत रविवारी ४८ हजार ६३८ बालकांना डोस ...

शहरात ४२ हजार ६४७ बालकांना पोलिओ डोस
कोल्हापूर : शहरात महापालिका प्रशासनाकडून रविवारी पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेंतर्गत रविवारी ४८ हजार ६३८ बालकांना डोस देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ४२ हजार ६४७ बालकांना डोस देण्यात आला. एकूण १७३ ठिकाणच्या ४४२ केंद्रांमध्ये सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत ही मोहीम राबविण्यात आली. बसस्टॉप, रेल्वेस्थानक, नाके व अंबाबाई मंदिर याठिकाणीही लसीकरण मोहीम घेण्यात आली.
सावित्रीबाई फुले रुग्णालयात उपायुक्त निखील मोरे यांच्या हस्ते सकाळी आठ वाजता बालकाला लस देऊन या मोहिमेची सुरुवात झाली. आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ, आरसीएच नोडल अधिकारी डॉ. अमोलकुमार माने, सावित्रीबाई फुले रुग्णालयाचे प्रशासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पावरा यावेळी उपस्थित होते. तसेच पुणे राज्य लसीकरण अधिकारी डॉ. दिलीप पाटील यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालय येथील लसीकरण केंद्राला भेट देऊन पल्स पोलिओच्या कामकाजाची माहिती घेतली. सी. पी. आर. रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका, नर्सिंग सेंटरमधील प्रशिक्षणार्थी परिचारिका तसेच डॉ. डी. वाय. पाटील नर्सिंग इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल कॉलेज आदींनी या माेहिमेसाठी परिश्रम घेतले.
चौकट
पोलिओ रोगाचे समूळ उच्चाटन करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार रविवारी पोलिओ लसीकरण मोहीम राबविली. नागरिकांमधून याला चांगला प्रतिसाद मिळाला. आज, सोमवारपासून ५ फेब्रुवारीपर्यंत घरभेटीच्या माध्यमातून रविवारी लस दिलेली नसलेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना डोस दिले जाणार आहेत.
डॉ. अमोलकुमार माने, माता, बाल संगोपन अधिकारी, महापालिका
फोटो : ३१०१२०२१ कोल केएमसी पोलिओ न्यूज
ओळी : कोल्हापूर महापालिकेकडून उपायुक्त निखील मोरे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले रुग्णालयात रविवारी पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.